BSNLचं न्यू ईयर गिफ्ट! वर्षभर असणाऱ्या प्लॅनची व्हॅलिडिटी वाढवली, ऑफर फक्त एवढे दिवस

Last Updated:

BSNL ने नवीन वर्षासाठी एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. सरकारी कंपनी आता आपल्या 395 दिवसांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 14 महिन्यांची व्हॅलिडिटी देतेय.

बीएसएनएल
बीएसएनएल
मुंबई : BSNL ने आपल्या कोट्यवधी यूजर्सना नवीन वर्षाच्या निमित्ताने एक नवीन भेट दिली आहे. भारत संचार निगम लिमिटेडने त्यांच्या 395 दिवसांच्या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी एका महिन्याने वाढवली आहे. या प्लॅनमध्ये आता यूजर्सना 395 दिवसांऐवजी 425 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या प्लॅनमध्ये आता यूजर्सचे सिम एक दोन नव्हे तर 14 महिने ॲक्टिव्ह राहतील. BSNL ने आपल्या अधिकृत X हँडलवरून ही नवीन ऑफर जाहीर केली आहे.
BSNLने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवीन वर्षावर एक विशेष ऑफर सादर करण्यात आली आहे. यूझर्सना आता 2,399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 425 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. BSNL ची ही ऑफर 16 जानेवारी 2025 पर्यंतच व्हॅलिड असेल. 16 जानेवारीपासून सरकारी कंपनीच्या या रोमांचक ऑफरचा लाभ युजर्स घेऊ शकतात.
advertisement
BSNL चा 2399 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, भारत संचार निगम लिमिटेडच्या या दीर्घ व्हॅलिडिटीच्या प्लॅनमध्ये, यूझर्सना संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये यूझर्सना दररोज 2GB हायस्पीड डेटा आणि 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळेल. अशा प्रकारे, यूझर्सना या प्लॅनमध्ये एकूण 850GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळेल. दैनंदिन 2GB डेटा लिमिट संपल्यानंतरही, यूझर्सना 40kbps वेगाने अनलिमिटेड इंटरनेटचा लाभ मिळत राहील.
advertisement
Jioची हॅपी न्यू ईयर ऑफर
रिलायन्स जिओनेही नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. Jio चा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 2025 रुपयांच्या किंमतीत येतो. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, यूझर्सना दररोज 2.5GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये, अनलिमिटेड कॉलिंग आणि विनामूल्य राष्ट्रीय रोमिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळेल. जिओची ही ऑफर 11 जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
BSNLचं न्यू ईयर गिफ्ट! वर्षभर असणाऱ्या प्लॅनची व्हॅलिडिटी वाढवली, ऑफर फक्त एवढे दिवस
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement