Smartphone विषयीच्या 'या' अफवांवर कधीच ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल नुकसान
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
स्मार्टफोनबद्दल अनेक अफवा आणि समज लोकांमध्ये पसरतात. आज आम्ही तुम्हाला त्यामागील सत्याची जाणीव करून देणार आहोत.
मुंबई : सोशल मीडियावर आणि दैनंदिन जीवनात स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्सबद्दल अनेक प्रकारच्या अफवा सुरू असतात. बरेच लोक असं मानतात की फ्लाइट मोडमध्ये फोन जलद चार्ज होतो. तर काहींचा असा विश्वास आहे की फोनची खराब झालेली बॅटरी फ्रीजरमध्ये ठेवल्याने ती दुरुस्त होते. तुमच्यापैकी अनेकांनी अशा अफवा ऐकल्या असतील किंवा वापरून पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशा काही अफवा आणि त्यामागील सत्य सांगणार आहोत.
एअरप्लेन मोडमध्ये बॅटरी जलद चार्ज होते का?
हे खरे नाही. फोन एअरप्लेन मोडमध्ये सिग्नल शोधणे थांबवतो. तरी त्याचा बॅटरीच्या चार्जिंग स्पीडवर फारसा परिणाम होत नाही. फोन फास्ट आणि सुरक्षितपणे चार्ज करण्यासाठी सुसंगत चार्जर आणि केबल असणे आवश्यक आहे. हो, फोन बंद केल्याने, त्यात चालणाऱ्या बॅकग्राउंड प्रोसेस थांबतात आणि तो थोडा जलद चार्ज होऊ शकतो.
advertisement
बॅकग्राउंड अॅप्स बंद केल्याने बॅटरीची बचत होते का?
हे पूर्णपणे चुकीचे आहे, खरं तर उलट घडते. तुम्ही फोनमधील बॅकग्राउंड अॅप्स बंद केले नाहीत तर बॅटरी जास्त काळ टिकेल. अॅप्स वारंवार बंद केल्याने आणि पुन्हा उघडल्याने जास्त बॅटरी खर्च होते. अॅप बंद केल्याने आणि उघडल्याने ते रॅममध्ये रीलोड होते, ज्यामुळे जास्त बॅटरी खर्च होते.
advertisement
ओले डिव्हाइसेस तांदळात ठेवल्याने ते ठीक होते का?
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, ओले स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाइसेस तांदळात ठेवल्याने त्यांचा ओलावा निघून जाईल. खरंतर, तांदूळ हा एक मजबूत ड्रायरिंग एजंट नाही. तो हळूहळू फक्त पृष्ठभागावरील ओलावा शोषून घेतो, परंतु ते कण सोडतो जे चार्जिंग किंवा इतर पोर्टना नुकसान पोहोचवू शकतात.
advertisement
फ्रीजरमध्ये खराब झालेली बॅटरी दुरुस्त होते का?
view commentsबॅटरी हळूहळू चार्ज होऊ लागली किंवा जास्त गरम होऊ लागली तर काही लोक ती फ्रीजरमध्ये ठेवतात. त्यांना वाटते की, असे केल्याने बॅटरी दुरुस्त होऊ शकते. ही पूर्णपणे अफवा आहे. आजकाल बहुतेक फोन लिथियम-आयन बॅटरीसह येतात आणि या बॅटरी खूप थंड किंवा खूप गरम तापमानासाठी डिझाइन केलेल्या नसतात. त्या फ्रीजरमध्ये ठेवल्याने त्यांच्या रासायनिक अभिक्रिया मंदावतात, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Smartphone विषयीच्या 'या' अफवांवर कधीच ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल नुकसान


