Electricity Saving Tips : उन्हाळ्यात वीजेचा ‘मीटर स्पीड’ कमी करायचाय? 'हे' 7 घरगुती मंत्र वीजबचतीचा फुल प्रूफ फॉर्म्युला

Last Updated:

खरंतर आपण आपल्या घरातील वस्तुंचा योग्यप्रकारे वापर केला तर या पळणाऱ्या मीटरला आपण थांबवू शकतो. म्हणजेच काय तर आपला थोडासा समजूतदारपणा आपली मोठी बचत करु शकतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : उन्हाळा आता वाढतच चालला आहे त्यामुळे आता घरात एसी, कूलर, फॅन... हे सगळं दिवसरात्र चालू ठेवण्याची वेळ आली आहे. पण याचा परिणाम असा की या काळात वीजबिल देखील इतकं जोरात पळतं की इतर वेळेपेक्षा दुप्पट तर कधी तिप्पट वीज बिल येतं.
खरंतर आपण आपल्या घरातील वस्तुंचा योग्यप्रकारे वापर केला तर या पळणाऱ्या मीटरला आपण थांबवू शकतो. म्हणजेच काय तर आपला थोडासा समजूतदारपणा आपली मोठी बचत करु शकतो.
घरात सर्वात जास्त वीज बिल वापरणारी गोष्ट म्हणजे AC, तिचं तापमान 18 डिग्रीवर न ठेवता 24-26 डिग्री सेल्सिअसवर सेट केलं. तर तुमचं वीज बिल तुम्ही खुप मोठ्या प्रमाणात कमी करु शकता.
advertisement
तसेच दरवाजे-खिडक्या नीट बंद करत. थंड हवा बाहेर जाऊ नये आणि एसीवर भार नको वाढायला याची योग्य ती काळजी घ्या. याशिवाय, दर आठवड्याला एसीचा फिल्टर बाहेरुन साफ करणं देखील गरजेचं आहे, ज्यामुळे वर जमलेली धुळ कमी होईल.
कूलर ही अशाच पद्धतीनं वापरावा. खिडकी किंवा दरवाजा थोडा उघडा ठेवला तर आतली ओलसर हवा बाहेर जाते आणि थंडावा टिकून राहतो.
advertisement

फॅन, टीव्ही आणि लाइट; लहान सवयी, मोठा फरक

जर खोलीत कुणी नसेल तर फॅन आणि लाइट बंद करा. शक्यतो लाईट बंद ठेवा यामुळे उष्णता कमी जाणवेल आणि वीज बिल देखील कमी येईल.
त्याचप्रमाणे, टीव्ही फक्त गरज असताना चालू ठेवा, जर कोणी टीव्ही पाहणारं नसेल तर टीव्ही बंद ठेवावा.
फ्रिजचं दार उगाचच उघडणं बंद झालं. थोड्या वेळानं गरज नसताना उगाच फ्रीजचा दरवाजा उघण्याची अनेकांना सवय असते. पण असं करु नका आणि आपल्या मुलांना ही याबद्दल समजवा.
advertisement
वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर फक्त जेव्हा कपडे आणि भांडी भरपूर असतील तेव्हाच वापरा. एलईडी बल्ब वापरणं हे आता त्यांच्या घरात सवयीसारखं झालं होतं. त्याचा ही वापर करणं टाळा.
मग बघा कसं तुमचं वीज बिल झटक्यात कमी येईल. वीज बिल कमी करण्यासाठी वस्तु वापरणं एकदमच बंद करण्याची गरज नाही. गोष्टींचा योग्यप्रकारे वापर करुन देखील तुम्ही तुमच्या वीजेची बचत करु शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Electricity Saving Tips : उन्हाळ्यात वीजेचा ‘मीटर स्पीड’ कमी करायचाय? 'हे' 7 घरगुती मंत्र वीजबचतीचा फुल प्रूफ फॉर्म्युला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement