थेट अंतराळातून पृथ्वीवर करता येईल फोन, ISRO चं स्पेशल मिशन, जग पाहत राहिल!

Last Updated:

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात म्हणजेच अगदी डोंगराळ भागात, जंगल किंवा समुद्रातल्या बेटांवर मोबाइल नेटवर्क पोहोचवणं हा या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे.

News18
News18
मुंबई : मोबाइल आता गरजेची वस्तू बनला आहे. देशभरात मोबाइल, इंटरनेट सेवेचा वेगानं विस्तार होत आहे. अनेक शहरांत 5G सुविधा सुरू झाली आहे. येत्या काळात मोबाइल सेवा अधिकच विस्तारत जाईल. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे भविष्यात अंतराळातून मोबाइलवर कॉल करणं शक्य होणार आहे. यासाठी इस्रोने एक खास मोहीम आखली आहे.
इस्रोसाठी 2025 हे वर्ष खूप खास असेल. येत्या सहा महिन्यांत इस्रो एकामागोमाग एक मोठ्या मोहिमा काढणार आहे. यात गगनयान मोहीम आणि भारत-अमेरिकेचा आत्तापर्यंतचा सर्वांत महागडा संयुक्त उपग्रह एनआयएसएआर याचा समावेश आहे. लवकरच थेट उपग्रहाच्या साह्याने कॉल करणं शक्य आहे.
2025च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात इस्रो एक अमेरिकी कम्युनिकेशन सॅटेलाइट अर्थात उपग्रह लाँच करत आहे. या उपग्रहाच्या मदतीनं थेट अंतराळात जोडलं जाऊन कॉल करणं शक होईल किंवा इंटरनेटचा वापर करता येईल. विशेष म्हणजे यासाठी खास हँडसेट किंवा डिव्हाइसची गरज नसेल. हे लाँचिंग पूर्णतः व्यावसायिक स्वरूपाचं असेल. इस्रोचा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड अर्थात एनएसआयएल हा व्यावसायिक विभाग हे काम करील.
advertisement
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो अमेरिकेच्या एएसटी स्पेस मोबाइल कंपनीचा उपग्रह प्रक्षेपित करील. ही मोहीम एका विशेष तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामुळे मोबाइल फोन थेट उपग्रहांशी जोडला जाऊ शकेल. एखाद्या अमेरिकी कंपनीने भारतातून मोठा दळणवळण उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने आतापर्यंत अमेरिकी कंपन्यांचे छोटे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
advertisement
जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात म्हणजेच अगदी डोंगराळ भागात, जंगल किंवा समुद्रातल्या बेटांवर मोबाइल नेटवर्क पोहोचवणं हा या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. आता मोबाइल टॉवरशिवाय कॉल आणि इंटरनेटची सुविधा मिळेल. ज्या भागात नेटवर्क कव्हरेजचं मोठे आव्हान आहे, त्या भागासाठी ही गोष्ट क्रांतिकारी ठरेल.
त्यामुळे जगभरात नेटवर्क कव्हरेज मिळेल. तसंच दुर्गम भागातही ते उपलब्ध होईल. आपत्कालीन स्थितीत या गोष्टीची मदत होईल. पूर, भूकंप किंवा आपत्कालीन स्थितीत जेव्हा मोबाइल टॉवर फारसे उपयुक्त ठरत नाहीत तेव्हा हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. यामुळे मोबाइल नेटवर्क कंपन्यांचा खर्च कमी होईल आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल.
advertisement
कंपनीने सांगितलं, की ही सेवा (अंतराळातून थेट कॉल) वापरण्यासाठी कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरची (एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या मोबाइल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या) गरज भासणार नाही. यासाठी आम्ही जगभरातल्या मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्ससोबत काम करत आहोत.
हा एक प्रगत आणि मोठा उपग्रह आहे. तो डायरेक्ट - टू- सेल या तंत्रज्ञानावर डिझाइन करण्यात आला आहे. हा उपग्रह थेट फोनवर सिग्नल पाठवेल. त्यामुळे कोणताही मध्यस्थ टॉवर किंवा नेटवर्कशिवाय तुमचा मोबाइल काम करील. याचा अर्थ तुमचा स्मार्टफोन थेट अंतराळाशी जोडला जाईल. ही मोहीम इस्रोसाठी एक महत्त्वाचं यश ठरेल. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत होईल.
advertisement
या उपग्रहाचा अँटेना अंदाजे 64 चौरस मीटर असेल. त्याचा आकार फुटबॉल मैदानाच्या तुलनेत निम्मा असेल. त्याचं वजन सुमारे 6000 किलो असेल. भारतातल्या श्रीहरिकोटा इथून इस्रोच्या एलव्हीएम-3 रॉकेटच्या (बाहुबली) माध्यमातून हा उपग्रह खालच्या कक्षेत पाठवला जाईल. हे प्रक्षेपण इस्रोसाठी एक महत्त्वाचं यश ठरेल. कारण यामुळे अमेरिकी कंपन्यांचा भारताच्या रॉकेट प्रक्षेपण प्रणालीवरचा विश्वास वाढेल. यापूर्वी एलव्हीएम-3ने दोन वेळा 'वनवेब' उपग्रह समूह यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
थेट अंतराळातून पृथ्वीवर करता येईल फोन, ISRO चं स्पेशल मिशन, जग पाहत राहिल!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement