वन प्लसच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा OxygenOS 14 मध्ये काय मिळणार खास?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
वनप्लसने आणली ऑक्सिजनओएस 14 ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम
मुंबई, 26 सप्टेंबर: वनप्लसने अँड्रॉइड 14वर आधारित ऑक्सिजनओएस 14 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणली आहे. गुगलने अद्याप नवी व्हर्जन सर्वांसाठी उपलब्ध केलेली नाही; मात्र वनप्लसने नवी ऑक्सिजन ओएस जाहीर केली असून, ग्राहक कोणकोणत्या फीचर्सची अपेक्षा करू शकतात, याबद्दलची माहितीही जाहीर केली आहे.
वनप्लस कंपनीने याला दुजोरा दिला आहे, की लेटेस्ट वनप्लस 11 फाइव्ह जी हा फोन अँड्रॉइड 14 अपडेट मिळणारा पहिला फोन असेल. हा अपडेट नोव्हेंबर 2023च्या मध्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. आगामी काही आठवड्यांत वनप्लस कंपनीच्या आणखी काही फोन्सना बेटा अँड्रॉइड 14 अपडेट मिळणार आहे. या नव्या ऑक्सिजन ओएस 14बद्दल जाणून घेऊ या.
advertisement
कंपनीने शेअर केलेल्या डिटेल्सनुसार, ऑक्सिजन ओएस 14 हे बहुतांशी ओप्पोच्या कलर ओएस सॉफ्टवेअरप्रमाणे वाटत आहे. ते काही बाबतींत चांगलं आणि काही बाबतींत वाईट असू शकतं. ऑक्सिजन ओएस 14ला मटेरियल यू एलिमेंटची हिंट असण्याची अपेक्षा होती; मात्र वनप्लस कंपनीने त्याची ओरिजिनॅलिटी आणि फ्लुइडिटी कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक गोष्टी अद्याप कळायच्या आहेत.
advertisement
'फाइल डॉक'सारखी काही इंटरेस्टिंग फीचर्स त्यात आहेत. टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओज एकत्रितरीत्या ठेवण्यासाठी आणि इतरांशी शेअर करण्यासाठी नोट्समध्ये कन्व्हर्ट करण्याकरिता त्या फीचरचा उपयोग होणार आहे. कंपनीने स्मार्ट कटआउट नावाचं फीचरही आणलं आहे. फोटोचा ठरावीक भाग सिलेक्ट करून तो फोटोतून बाहेर काढणं त्यामुळे शक्य होणार आहे. यापूर्वी सॅमसंगने वन यूआयमध्ये अशा प्रकारचं फीचर आणलं होतं.
advertisement
काही नवे रिंगटोन्सही कंपनीने आणले असून, अॅक्वामॉर्फिक डिझाइनमध्येही कंपनीने काही अपडेट्स आणले आहेत. अॅप्स अॅक्सेस करताना हा अधिक पारदर्शक इंटरफेस असेल, असा दावा करण्यात आला आहे.
ट्रिनिटी इंजिन या फीचरबद्दलही वनप्लसने माहिती दिली आहे. त्याद्वारे फोनच्या हार्डवेअरची पूर्ण क्षमता उलगडली जाते. सीपीयू व्हायटलायझेशन आणि रॅम व्हायटलायझेशन असे दोन प्रकारही असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. त्या दोन्हींमुळे चिप आणि मेमरीचा परफॉर्मन्स वाढत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या ऑक्सिजनओएस 14मध्ये असलेल्या फीचर्सची संख्या कमी आहे; मात्र आगामी अपडेट्समध्ये त्यात काही फीचर्सची भर पडण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत आणखी काही वनप्लस फोन्स आणि नॉर्ड फोन्समध्ये ऑक्सिजन ओएस 14चा वापर केला जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2023 4:14 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
वन प्लसच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा OxygenOS 14 मध्ये काय मिळणार खास?