तुमच्या पर्सनल गोष्टी स्मार्टफोन तर ऐकत नाही ना? समोर आला धक्कादायक अहवाल!
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
आपण इंटरनेटवर जे सर्च करतो, त्यानुसार आपल्याला उत्पादनांबद्दलच्या जाहिराती किंवा बातम्या सुचवल्या जातात, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, पण बरेचदा असं होतं की आपण एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करतो आणि त्याची जाहिरात आपल्याला थोड्या वेळानं मोबाईलवर दिसते.
नवी दिल्ली, 19 डिसेंबर : आपण इंटरनेटवर जे सर्च करतो, त्यानुसार आपल्याला उत्पादनांबद्दलच्या जाहिराती किंवा बातम्या सुचवल्या जातात, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, पण बरेचदा असं होतं की आपण एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करतो आणि त्याची जाहिरात आपल्याला थोड्या वेळानं मोबाईलवर दिसते. एखाद्या ठिकाणाची माहिती, ट्रॅव्हल कंपनीची जाहिरात, वस्तू किंवा उत्पादनांची जाहिरात अशाच प्रकारे दिसते. हा अनुभव अनेकांना आला असेल. ते खरं असतं का? ‘आज तक’नं त्या बाबत वृत्त दिलं आहे.
स्मार्ट फोन, टीव्ही किंवा स्पीकर यांच्यामार्फत तुमचं बोलणं ऐकलं जात आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर कदाचित हे खरं असू शकतं. त्याबाबत नुकताच एक अहवाल समोर आलाय. यात असा दावा करण्यात आलाय, की स्मार्ट डिव्हायसेस आपलं बोलणं ऐकतात आणि त्यांचा वापर जाहिरातीसाठी करतात. मार्केटिंग कंपन्यांच्या मते, ते युजर्सचं बोलणं फोन आणि स्मार्ट स्पीकरच्या मदतीने ऐकू शकतात. यामुळे युजर्सना जाहिराती देणं सहज शक्य होतं. कॉक्स मीडिया ग्रुपच्या मार्केटिंग टीमच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे ग्राहकांच्या आजूबाजूचा आवाज ऐकण्याची क्षमता आहे. ते स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर डिव्हायसेसमध्ये असलेल्या मायक्रोफोनच्या मदतीने हे करू शकतात.
advertisement
डिव्हायसेसच्या मायक्रोफोनवरून बोलणं ऐकल्याचा उपयोग जाहिरातींसाठी केला जातो. 404 मीडियाने त्यांच्या अहवालात ही माहिती दिली आहे. अर्थात स्मार्टफोन, स्पीकर आणि इतर स्मार्ट गॅजेट्स आपलं बोलणं ऐकतात का, असे प्रश्न या पूर्वीही अनेकदा उपस्थित झालेत. अनेक कंपन्या हे दावे नाकारतात, पण इंटरनेट आणि स्मार्ट उपकरणांच्या जगात हेच वास्तव आहे.
advertisement
उदाहरणार्थ तुम्ही घरी बसून कार किंवा नवीन फोन घेण्याबाबत चर्चा करत असाल, तर काही काळानंतर तुम्हाला अशा जाहिराती दिसू लागतात. तुमच्या स्मार्टफोनवरचं कोणतंही अॅप अनावश्यकपणे मायक्रोफोनची परवानगी घेत असेल, तर ते तुमचा आवाज ऐकत असल्याची शक्यता असते. अनेक वेळा कंपन्या टार्गेटेड जाहिरातींसाठी लोकांचं संभाषण ऐकतात. तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनच्या अॅप सेटिंग्जवर जा. तिथे अॅप्स विभागात जा. तिथे अॅप्सची यादी दिसते. त्यावर टॅप करून कोणत्या अॅप्सने तुमच्या फोनच्या किती परवानग्या घेतल्या आहेत हे तपासता येऊ शकतं. अशा अनेक अॅप्सना तुमच्या मायक्रोफोन आणि कॅमेर्याची विनाकारण परवानगी मिळते, ती धोकादायक असू शकतं.
advertisement
मात्र हे वृत्त समोर आल्यावर ‘सीएमजी’ने संभाषण ऐकलं जात असल्याचा भाग त्यांच्या लेखातून काढून टाकला. आजपर्यंत कोणत्याही टेक्नॉलॉजी कंपनीने ही गोष्ट स्वीकारलेली नाही. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच दिसते. तुमच्या डिव्हायसेसमध्ये माईक असतोच, तो तुमचं बोलणं ऐकतही असतो, पण तो सक्रिय नसतो. त्यांना सक्रिय करण्यासाठी तुम्हाला काही शब्द बोलावे लागतात. उदा. गुगल असिस्टंट सक्रिय करण्यासाठी किंवा अलेक्सा सक्रिय करण्यासाठी ओके गुगल असं म्हटलं जातं. थोडक्यात विशिष्ट कमांड सक्रिय केल्यानंतर हे घडतं. स्मार्ट स्पीकर्सच्या बाबतीत थोडं वेगळं असतं. तुम्हाला तिथे माईक डिसेबल करण्याचा पर्याय मिळतो.
advertisement
याचाच अर्थ कंपन्या कितीही नाकारत असल्या, तरी आपल्या स्मार्ट डिव्हायसेसच्या मायक्रोफोनवरून बोलणं ऐकलं जातं व त्याचा उपयोग मार्केटिंग आणि जाहिरातींसाठी केला जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2023 5:18 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
तुमच्या पर्सनल गोष्टी स्मार्टफोन तर ऐकत नाही ना? समोर आला धक्कादायक अहवाल!









