1 रुपयांत सिम, फ्री मिळेल 4G इंटरनेट! BSNL ची यूझर्ससाठी धमाकेदार ऑफर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
BSNLने नवीन ग्राहकांसाठी फक्त 1 रुपयांत Diwali Bonanza Plan लाँच केला आहे. ज्यामध्ये 4G सर्व्हिस, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळतात. ही ऑफर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत वैध आहे.
नवी दिल्ली : सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने या दिवाळीत नवीन ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर लाँच केली आहे. कंपनी फक्त 1 रुपयांत 4G सर्व्हिस देत आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB हाय-स्पीड डेटा आणि दररोज 100 एसएमएस समाविष्ट आहेत. ही ऑफर फक्त नवीन ग्राहकांसाठी व्हॅलिड आहे आणि 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत वैध असेल. कंपनीने याला "दिवाळी बोनान्झा प्लॅन" असे नाव दिले आहे. बीएसएनएलने म्हटले आहे की ही ऑफर भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या त्यांच्या 4G नेटवर्कची क्वालिटी दाखविण्याची संधी आहे.
या योजनेअंतर्गत, ग्राहकांना फक्त 1 रुपयाची टोकन रक्कम द्यावी लागेल. यानंतर, 30 दिवसांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या कालावधीत, यूझर्सना फ्री अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 2GB जीबी हाय-स्पीड इंटरनेट आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. बीएसएनएल एक नवीन सिम कार्ड देखील मोफत देईल. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी म्हणाले, "ही ऑफर ग्राहकांना आमच्या स्वदेशी विकसित 4G नेटवर्कचा अनुभव घेण्याची संधी देते. आम्हाला विश्वास आहे की आमची सेवा क्वालिटी आणि कव्हरेज 30 दिवसांच्या फ्री सबस्क्रिप्शन कालावधीनंतरही ग्राहकांना आमच्यासोबत ठेवेल."
advertisement
BSNLच्या ग्राहकांची संख्या यापूर्वी वाढली आहे
बीएसएनएलने अशी ऑफर लाँच करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्ट 2025 मध्ये, कंपनीने अशीच एक प्रमोशनल योजना सुरू केली. ज्यामुळे त्यांचा मोबाइल ग्राहक संख्या 1.38 लाखांपेक्षा जास्त वाढली. त्यावेळी, बीएसएनएलने नवीन ग्राहकांच्या संख्येत खाजगी कंपनी एअरटेललाही मागे टाकले. जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांनी आधीच टेलिकॉम मार्केटमध्ये मजबूत स्थान मिळवले असताना, बीएसएनएल अशा ऑफरसह आपली स्पर्धात्मक धार पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
advertisement
स्वदेशी 4G नेटवर्कवरून वाढलेला विश्वास
BSNLची ऑफर केवळ स्वस्त डेटापुरती मर्यादित नाही, तर ती त्यांच्या भारतीय बनावटीच्या 4G नेटवर्कला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. कंपनीने अलीकडेच देशभरात स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेल्या 4G पायाभूत सुविधा सुरू करण्यास सुरुवात केली आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत BSNL हळूहळू 5G चाचण्यांकडे देखील वाटचाल करू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 11:59 AM IST