Tech Fact : स्मार्टफोनमधील ‘Airplane Mode’ नेमकं काय कामाचं? ते नेमकं करतं तरी काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर आम्ही विमानात गेलोच नाही तर या बटणाचा काही उपयोगच नाही, मग हा बटण तरी कशाला ठेवताता? असं लोकांना वाटतं. पण तुम्हाला माहितीय का की 'Airplane Mode' म्हणजे केवळ विमान प्रवासापुरताच मर्यादित नसून, याचा उपयोग वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये केला जातो. पण नेमकं हे मोड करतं तरी काय?
मुंबई : आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ‘Airplane Mode’ नावाचा पर्याय असतो. पण अनेकांना हा फिचर फक्त विमानात वापरण्यासाठीच असतो असं वाटतं. जर आम्ही विमानात गेलोच नाही तर या बटणाचा काही उपयोगच नाही, मग हा बटण तरी कशाला ठेवताता? असं लोकांना वाटतं. पण तुम्हाला माहितीय का की 'Airplane Mode' म्हणजे केवळ विमान प्रवासापुरताच मर्यादित नसून, याचा उपयोग वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये केला जातो. पण नेमकं हे मोड करतं तरी काय?
चला थोडं सविस्तर जाणून घेऊ
‘Airplane Mode’ सुरू केल्यावर तुमच्या फोनची सर्व वायरलेस कनेक्टिव्हिटी बंद होते. म्हणजेच:
मोबाईल नेटवर्क (संपर्क, इंटरनेट), WiFi, Bluetooth, GPS हे सगळं काही फोन्समध्ये बंद होतं, काहींमध्ये सुरू राहतं. यामुळे फोन कोणत्याही सिग्नलला प्रसारित (transmit) किंवा स्वीकारत (receive) नाही.
का असतो 'Airplane Mode'?
विमानात असताना फोनचे नेटवर्क सिग्नल विमानातील नेव्हिगेशन सिस्टीममध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात उड्डाणाच्या वेळेस ‘Airplane Mode’ सुरू करणे आवश्यक असते.
advertisement
इतर उपयोग काय?
‘Airplane Mode’ चे इतर काही उपयुक्त फायदेही आहेत:
बॅटरी बचत: फोन नेटवर्क शोधत राहतो, त्यामुळे बॅटरी जलद संपते. Airplane Mode मध्ये बॅटरी टिकते.
मन शांत ठेवण्यासाठी: सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सपासून दूर राहण्यासाठी हा मोड उपयोगी.
फोन लवकर चार्ज होतो: कनेक्टिव्हिटी बंद असल्याने फोन जलद चार्ज होतो.
नेटवर्क नको असताना: ट्रेन किंवा जिथे नेटवर्क सतत बदलतं, तिथे सिग्नल शोधण्यापेक्षा हा मोड सुरू केल्यास फोनची गरम होण्याची आणि बॅटरी खर्च होण्याची शक्यता कमी होते.
advertisement
आता तुम्हाला लक्षात आलंच असेच की हा साधा दिसणारा मोड किती कामाचा आहे ते?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2025 3:56 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Tech Fact : स्मार्टफोनमधील ‘Airplane Mode’ नेमकं काय कामाचं? ते नेमकं करतं तरी काय?


