गुगल पिक्सेल 8 सीरिज देणार iphone ला टक्कर? किंमतींवरुन चर्चा सुरू
- Published by:News18 Digital
- trending desk
Last Updated:
गुगल 4 ऑक्टोबर 2023 रोजी आपली Pixel 8 सीरिज लाँच करण्यासाठी सज्ज आहे. रिपोर्टनुसार, Pixel 8 आणि Pixel 8 Pro या दोन्हींच्या किंमती या वर्षी वाढतील.
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : गुगल 4 ऑक्टोबर 2023 रोजी आपली Pixel 8 सीरिज लाँच करण्यासाठी सज्ज आहे. रिपोर्टनुसार, Pixel 8 आणि Pixel 8 Pro या दोन्हींच्या किंमती या वर्षी वाढतील. कारण अमेरिकेत त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे, असं 9to5Google ने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या फोनच्या किमती, फीचर्स व स्पेसिफिकेशन काय असतील, याबाबत जाणून घेऊ या.
बऱ्याचदा आपण गुगलसारख्याच डिव्हाइसेसना मॅच करणाऱ्या इतर कंपन्यांच्या फोनच्या किंमती पाहिल्या आहेत. उदाहरणार्थ, भारतात Galaxy S23 ची किंमत 74,999 रुपये आहे, तर Pixel 7 ची किंमत 59,999 रुपये आहे. रिपोर्टमध्ये असं नमूद केलं आहे, की Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केल्यापासून Googleचे प्रयत्न "व्हॅल्यू" डिलिव्हर करण्यावर आहेत; मात्र पुढच्या रिलीजसह, Pixel 8 आणि Pixel 8 Pro ची किंमत अनुक्रमे 699 डॉलर्स आणि 999 डॉलर्सवर 100 डॉलर्सची वाढ दिसू शकते. शिवाय, 12 ऑक्टोबर रोजी फोन रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. प्री-ऑर्डर लाँच तारखेपासूनच सुरू होतील.
advertisement
भारतासह संवेदनशील देशांमध्ये गुगल या मॉडेल्सच्या किमती वाढवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महत्त्वाचं म्हणजे भारतात सेकंड जनरेशनमधलं पिक्सेल वॉच लाँच करून गुगल गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय बदल करत आहे. डेब्यू पिक्सेल वॉच गेल्या वर्षीच्या Pixel 7 स्मार्टफोन्स सीरिजमधून गायब होती.
पिक्सेल 8 सीरिज स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स : काय अपेक्षा करावी
advertisement
Google Pixel 8 सीरिज गुगलच्या तिसऱ्या जनरेशनमधल्या इन-हाउस Tensor G3 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल अशी अपेक्षा आहे. मागच्या बाजूस कॅमेरा मॉड्यूलमध्ये काही बदलांसह, Pixel 7 आणि Pixel 7 Pro प्रमाणेच डिझाइन असेल, असं म्हटलं जात आहे; मात्र रिपोर्ट्सनुसार Pixel 7 Pro मध्ये दिसणारे कर्व्ह पॅनेल सोडून Pixel 8 मॉडेल्समध्ये 6.7-इंच फ्लॅट स्क्रीन असू शकते.
advertisement
कॅमेरा क्षमतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, पिक्सेल 8 सीरिज व्हिडिओसाठी नाइट मोड देऊ शकते. त्यामुळे युझर्सना कमी-प्रकाशातही चांगले व्हिडिओ कॅप्चर करता येतील.
MySmartPrice च्या अलीकडच्या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे, की प्रत्येक Pixel 8 मॉडेल तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतील. Pixel 8 Pro स्काय ब्लू, पोर्सिलेन आणि ब्लॅक ऑब्सिडियनमध्ये येऊ शकतो, तर Pixel 8 Peony Rose, Grey आणि Obsidian Black मध्ये उपलब्ध असू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2023 11:12 AM IST