जुन्या फोनचा असा करा वापर! ट्रॅव्हलिंग दरम्यान कठीण गोष्टी होतील सोप्या
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
खुप कमी लोकांना माहिती असेल की, तुमचा जुना अँड्रॉइड फोन तुमचा ट्रॅव्हल कंपेनियन बनू शकतो. हे सुट्ट्यांदरम्यान तुमचे कामी येईल. यासोबतच पैसेही वाचवेल.
मुंबई : फोन जुना झाला की तो तसाच घरात पडून राहतो. मात्र तो तुम्ही विचार करता त्यापेक्षाही जास्त कामाचा आहे. तुम्ही हे सिक्योरिटी कॅमेरापासून तर एंटरटेनमेंट पॉडपर्यंत वापरु शकता. आज आम्ही तुम्हाला याचा असा वापर सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसले. ही पद्धत फक्त तुमच्या अडचणी सोप्या करत नाही तर सुट्ट्यांना आणखी मजेदार बनवते. चला जाणून घेऊया जुन्या फोनचा असाच एक वापर...
प्रवास करताना जुना फोन हा सर्वोत्तम टेक गॅझेट असू शकतो. अनेक हॉटेल्स एका खोलीत एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसला वाय-फायशी कनेक्ट करण्याची परवानगी देतात. अधिक डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च येऊ शकतो. तुम्ही तुमच्यासोबत फोन आणि लॅपटॉप आणलात तर तुम्हाला दोन्ही वापरण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागू शकतात. अशा परिस्थितीत, तुमचा जुना फोन खूप उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही तुमचा जुना फोन पर्सनल वाय-फाय राउटरमध्ये बदलू शकता, ज्यामुळे तुम्ही एकही पैसा न देता एकाच वेळी अनेक डिव्हाइस कनेक्ट करू शकता.
advertisement
तुमचा फोन वायफाय राउटरमध्ये कसा बदलायचा:
तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बिल्ट-इन मोबाइल हॉटस्पॉट फीचरचा वापर वायफाय राउटर म्हणून करण्यासाठी करू शकता. प्रथम, तुमचा जुना फोन हॉटेलच्या वायफायशी कनेक्ट करा. नंतर, शेअर वायफाय किंवा वायफाय शेअरिंग फीचर वापरून, तुम्ही ते कनेक्शन इतर डिव्हाइसेससह शेअर करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सुरक्षा कॅमेरा यांसारखी इतर डिव्हाइसेस एकाच कनेक्शनशी कनेक्ट करू शकता.
advertisement
हॉटेलचा वायफाय वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी
हॉटेलचा वायफाय वापरताना तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की, हे पूर्णपणे सेफ नाही. पब्लिक वायफाय प्रमाणे येथेही तुमचे कनेक्शन कोणीही इंटरसेप्ट करु शकतो. ज्यामुळे तुमचा डेटा आणि पर्सनल इंफॉर्मेशन चोरी होण्याचा धोका राहतो. यामुळे बँकिंग अॅप्स इत्यादी वापरताना अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 7:50 PM IST







