Shocking Crime : धक्कादायक! जुना वाद टोकाला गेला, भावा-बहिंणीनी मिळून दोन महिलांसोबत केलं असं...; भिवंडीतील घटना

Last Updated:

Bhiwandi News : भिवंडी येथे शेजारील वादातून दोन महिलांना मारहाण झाली.दोन तरुणांनी महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

Bhiwandi
Bhiwandi
भिवंडी : भिवंडी शहरातील परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शेजारील वादातून ही घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद त्या वेळी मिटला असला तरी आरोपींनी मनात राग धरून ठेवला होता. याच रागातून शुक्रवारी सायंकाळी दीपक आणि सागर कुरे यांनी पीडित महिलेच्या घरासमोर येत जोरजोरात शिवीगाळ सुरू केली. यावेळी सुनीता यादव आणि तिची बहीण यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
वाद अधिकच वाढत गेला त्यानंतर आरोपींनी दोन महिलांना धक्काबुक्की करत मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.
मारहाणीमुळे जखमी झालेल्या महिलांनी तत्काळ नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दीपक कुरे, सागर कुरे, सुनीता यादव आणि तिच्या बहिणीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking Crime : धक्कादायक! जुना वाद टोकाला गेला, भावा-बहिंणीनी मिळून दोन महिलांसोबत केलं असं...; भिवंडीतील घटना
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement