भांडणाचा राग मनात होता, रणजीत चौकातून जाताना दिसला अन्..., उल्हासनगरमधील खळबळजनक घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विकी कोठणकर याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गणेश गायकवाड, प्रतिनिधी
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच उल्हासनगरमध्ये भर रस्त्यावर एका व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्लात तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ४ मध्ये संभाजी चौक परिसरात ही घटना घडली. रणजीत गायकवाड असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यात रणजीत गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सुरुवातीला त्यांना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलंय.
advertisement
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विकी कोठणकर याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रणजीत आणि कोठणकर यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, त्याच रागातून हा हल्ला हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. जखमी रणजीत गायकवाड यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे.
advertisement
हल्ला करणारा विकी कोठणकर याच्याविरोधात उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अशा हल्ल्यांमुळे बिघडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Ulhasnagar,Thane,Maharashtra
First Published :
December 04, 2025 10:49 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
भांडणाचा राग मनात होता, रणजीत चौकातून जाताना दिसला अन्..., उल्हासनगरमधील खळबळजनक घटना


