Thane : मुलाची तब्येत बिघडली,घाईघाईत रुग्णालयात गेले; घरी परतलेल्या पती-पत्नीसमोर आलं मोठ कांड
Last Updated:
Thane Diamond Theft : ठाण्यात रुग्णालयात घाईगडबडीमध्ये जात असताना घरातील 16 लाखांचे डायमंड दागिने चोरीला गेले. मोलकरीणवर संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ठाणे : ठाणे शहरातून एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली असून ज्यात घरातून तब्बल 16 लाख रुपयांचे डायमंडचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी घरातील काम करणाऱ्या मोलकरीण संगीता जाधववर संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या घटनेचा कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाच्या आजारामुळे रुग्णालयात गेले, परत आल्यावर
कळवा येथील बुधाजीनगर परिसरात राहणाऱ्या सीमा मोरे आणि त्यांचे पती आयटी कन्सल्टन्सी व्यवसायासाठी अमेरिकेत काम करतात. 7 जानेवारी रोजी रात्री जेवण करून झोपण्याची तयारी चालू असताना त्यांचा मुलगा ओमकारला अचानक उलटीचा त्रास होऊ लागला. आई-वडील ताबडतोब त्याला जुपिटर रुग्णालयात नेण्यासाठी घाईगडबडीत निघाले.
घरी परतल्यावर बसला भयंकर धक्का
घाईत निघताना सीमा मोरे यांनी हातातील डायमंडचे ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या बेडरूममधील स्लाइडिंग खिडकीवर ठेवले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर परत आल्यावर या दागिन्यांचा शोध घेतला असता ते चोरीला गेले होते.
advertisement
घडलेल्या घटनेची पोलिसांनी प्रकरणाची तक्रान घेऊन या प्रकरणी तपास सुरू केला आहे. स्थानिक परिसरात घरातील मोलकरीण संगीता जाधववर संशय व्यक्त केला जात असून तपासादरम्यान CCTV फुटेज आणि घरातील परिस्थितीची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 10:08 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : मुलाची तब्येत बिघडली,घाईघाईत रुग्णालयात गेले; घरी परतलेल्या पती-पत्नीसमोर आलं मोठ कांड









