हद्दच झाली! एसी लोकलमध्ये घडला तो प्रकार पुन्हा; रेल्वे प्रशासनाचेही डोके फिरले

Last Updated:

Mumbai Local Train Fake Pass Case : ठाण्यातील एका तरुणाला बनावट यूटीएस पास वापरून एसी लोकलने प्रवास केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिकीट तपासणीदरम्यान पास बनावट असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मोबाइल जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

Mumbai Local Train Fake Pass Case
Mumbai Local Train Fake Pass Case
ठाणे : मुंबई लोकल लाखो लोकांच्या दररोज प्रवासाचे मुख्य साधन असून गेल्या काही महिन्यांपासून यातून प्रवास करताना अनेकांनी बनावट पासचा वापर केला होता, असे प्रकार समोर आले होते. मात्र, या गोष्टीवर आळा बसण्यासाठी रेल्वेकडून कठोर कारवाईची मागणी झाली होत. पण असे असताना पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आलेला आहे. जिथे एका तरुणाने बनावट पास वापरुन एसी लोकलमधून प्रवास केला आहे.
एसी लोकलमध्ये असा प्रकार पुन्हा कसा?
रेल्वे प्रवासासाठी बनावट पास वापरल्याप्रकरणी ठाण्यातील अनिल पंजाबी (वय 20) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. या प्रकारानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 5 डिसेंबर रोजी रात्रीची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील तिकीट निरीक्षक प्रशांत कांबळे हे आपल्या अन्य सहकार्यांसोबत दादर-अंबरनाथ एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी करीत होते. साधारण रात्री 8:35 वाजता ते तिसऱ्या डब्यात तपासणीसाठी गेले असता त्यांना अनिल पंजाबी हा तरुण दिसला. त्यांनी त्याच्याकडे तिकीट किंवा पास दाखविण्याची मागणी केली.
advertisement
यावेळी अनिलने आपल्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप अॅपद्वारे एक पास दाखविला. हा पास युटिएसमधून तयार झाल्यासारखा दिसत होता. मात्र निरीक्षक कांबळे यांनी तो पास बारकाईने तपासला. मात्र तो बनावट असल्याचे त्यांना समजून गेले. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाचा मोबाईल ताब्यात घेतला आणि लगेच रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने त्याला ठाणे रेल्वे पोलिसांकडे न्हेले.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा पास त्याला एका मित्राने दिल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. पुढील तपासासाठी पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून बनावट पास वापरून प्रवास केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
हद्दच झाली! एसी लोकलमध्ये घडला तो प्रकार पुन्हा; रेल्वे प्रशासनाचेही डोके फिरले
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement