Kalyan Crime : माचिस न दिल्याचा राग, संतापलेल्या तरुणाने कोयता काढला अन्...कल्याण स्टेशन परिसर हादरला
Last Updated:
Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माचिस न दिल्याचा राग आल्याने संतापलेल्या तरुणाने कोयता काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री सिनेमातील प्रसंगालाही लाजवेल अशी घटना घडली. दारूच्या नशेत दोन तरुणांनी फक्त माचिस न दिल्याच्या कारणावरून थेट कोयता काढत दहशत माजवली. या घटनेमुळे स्टेशन परिसरात काही काळ भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी असे या दोघांचे नावे आहेत. हे दोघे रात्री कल्याण स्टेशन परिसरात आले. खिशातून सिगारेट काढत त्यांनी जवळच्या टपरीवाल्याकडे माचिस मागितली. परंतू टपरीचालकाने माचिस नाही असं सांगत देण्यास नकार दिला. एवढ्यावरून हे दोघे संतप्त झाले. नशेत डोकं फिरलेल्या आरोपींनी क्षणाचाही वाट न पाहता थेट कोयता बाहेर काढला आणि टपरीवाल्यावर आणि आजूबाजूच्या लोकांवर शिवीगाळ सुरू केली.
advertisement
हातात कोयता आणि डोळ्यात नशेचं वेड पाहून तेथील प्रवासी आणि दुकानदार अक्षरशः घाबरले. काही प्रवासी धावत पळाले, तर काहींनी लगेच पोलिसांना फोन लावला. काही क्षणात महात्मा फुले पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी नीलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी या दोघांना बेड्या ठोकल्या.
कल्याणसारख्या गजबजलेल्या स्टेशन परिसरात अशी घटना घडल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Kalyan Crime : माचिस न दिल्याचा राग, संतापलेल्या तरुणाने कोयता काढला अन्...कल्याण स्टेशन परिसर हादरला


