UPSC success story: दूध विक्रेत्याची मुलगी बनली IAS अधिकारी! ‘पहाडी बेटी’ अनुधारा पाल यांचा प्रेरणादायी प्रवास
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
UPSC success story: अनुराधा पाल यांनी हरिद्वारमधून शिक्षण घेत UPSC मध्ये ६२ वी रँक मिळवून आयएएस बनण्याचा मान मिळवला. त्यांची संघर्षमय वाटचाल आज अनेकांसाठी प्रेरणा आहे.
advertisement
घरी परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, उच्च शिक्षणासाठी पैसे जमवणं हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान होतं. त्यांचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी दुधाचा व्यवसाय करायचे.अनुराधा यांना हे पक्के माहीत होते की, मेहनत आणि योग्य दिशा यांची सांगड घातली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याच दृढनिश्चयामुळे त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.
advertisement
दोन वेळा परीक्षा उत्तीर्ण होत ६२ वी रँक मिळवून आयएएस बनण्याचा मान मिळवला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, इच्छाशक्ती मजबूत असेल तर ध्येय गाठता येते, हे अनुराधा यांनी सिद्ध करून दाखवलं.मूळच्या उत्तराखंडमधील हरिद्वारच्या असलेल्या अनुराधा पाल यांचा जन्म एका अगदी सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
advertisement
शालेय शिक्षणानंतर अनुराधा यांनी जीबी पंत विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी लगेच एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. पण काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांना जाणवले की त्यांचे खरे ध्येय हे यूपीएससी आहे. त्यानंतर त्यांनी खासगी नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली.
advertisement
दरम्यान, त्यांनी रुडकी येथील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम करायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांच्या कोचिंगचा खर्च भागवता येईल. कॉलेजमध्ये शिकवत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांचे ट्युशन्स घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपल्या कोचिंगची फी भरली. त्यांच्या या त्याग आणि मेहनतीचे फळ त्यांना मिळाले.
advertisement
२०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही केली. मात्र, त्यांचा एकूण स्कोर थोडा कमी असल्याने त्यांनी समाधान न मानता तयारी सुरूच ठेवली. अधिक तयारीसाठी त्या दिल्लीत गेल्या आणि तेथे एका नामांकित यूपीएससी ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागल्या. २०१५ साली दिलेल्या आपल्या दुसऱ्या प्रयत्नात अनुराधा यांनी ६२ वी रँक मिळवत आपले ध्येय साधले आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
advertisement


