Shocking : तीन मुलांना मित्राकडे ठेवलं अन् आई-बाप चित्रपटाला गेले, 2 वर्षाच्या चिमुकलीसोबत..., ठाणे हादरलं!
Last Updated:
Thane 2 Year Old Girl Kidnapped Crime News : आई-वडिलांचा मित्रावर ठेवलेला विश्वास त्यांना महागात पडलेला आहे. जिथे त्यांनी त्यांच्या मुलांना मित्राकडे सोडून चित्रपट पाहण्यासाठी निर्णय त्यांना कोणत्या ठिकाणी पोहचवल आहे ते सविस्तर पाहा.
ठाणे : ठाण्यासारख्या शहरात दोन वर्षीय चिमुकलीचे झालेले अपहरण हे कोणाच्याही अंगावर काटा आणणारे आहे. दररोजची लोकलची गर्दी, वाहतूक आणि गोंधळ यामध्ये रोजचे जीवन जगत असलेले नागरिक अचानक घडलेल्या या प्रकाराने हादरून गेले आहेत. चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पालकांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांच्या विश्वासातील कोण त्यांच्या चिमुकलीचे अपहरण करेल. तीन मुलांना जवळच्या व्यक्तीकडे ठेवून चित्रपट पाहून हे जोडपं घरी परतले. मात्र त्यांना समोर आलेला प्रसंग त्यांच्या आयुष्याला धक्का देणारा ठरला.
नेमक काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडप चित्रपट संपल्यानंतर घरी परतले तेव्हा त्यांनी ज्यांच्याकडे मुलं सांभाळण्यासाठी दिली होती त्यांना कॉल करुन त्यांना परत घरी सोडण्यासाठी सांगतिले. पण त्या ओळखीच्या व्यक्तीने पालकांना सांगितले 'मुलगी नाही घरी' तेव्हा त्या पालकांच्या पायाखालची जमिनच सरकरली.
दोन वर्षांची चिमुकली कुठे गेली? कोण घेऊन गेले? कोणत्या अवस्थेत असेल? हे विचार पालकांना अस्वस्थ करत होते. एका क्षणात आनंदाचा दिवस दुःखात बदलला. पालकांनी तातडीने ठाणे पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेला हा प्रकार सांगितला. पोलिसांनीही क्षणाचा उशिर न करता चिमुकलीचा तपास सुरु केला.ज्या परिसरातून मुलगी बेपत्ता झाली तेथील सीसीटीव्ही शिवाय अनेक साक्षीदारांचे जबाब यावर पोलिसांनी तपास सुरु ठेवला.
advertisement
पोलिसांच्या प्रयत्नांना यश
view commentsपोलिस तपास करत असताना या सर्व तपासाचा धागा थेट अंबरनाथपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी हा मुलांना सांभाळण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीचाच जवळचा मित्र होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी सुखरूप वाचवले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 12:51 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : तीन मुलांना मित्राकडे ठेवलं अन् आई-बाप चित्रपटाला गेले, 2 वर्षाच्या चिमुकलीसोबत..., ठाणे हादरलं!










