संभाजीनगर: उच्चभ्रू सोसायटीत रक्तरंजित थरार, डोक्यात डंबल घालून प्राध्यापकाची हत्या, कोर्टाकडून अल्पवयीन मुलाला मोठी शिक्षा

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत एका तरुणाने आपल्या प्राध्यापक वडिलांची डोक्यात डंबल घालून निर्घृण हत्या केली होती.

AI Generated Photo
AI Generated Photo
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात चार वर्षांपूर्वी भयावह हत्याकांड घडलं होतं. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत एका तरुणाने आपल्या प्राध्यापक वडिलांची डोक्यात डंबल घालून निर्घृण हत्या केली होती. त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन होता. तेव्हापासून आरोपी पुण्यातील निरीक्षण गृहात होता. आता या प्रकरणी संभाजीनगरच्या सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी १० डिसेंबर रोजी अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राध्यापकाच्या राहत्या घरी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्यात आरोपीने वडिलांच्या डोक्यात डंबेलने प्रहार केले होते. घटनेच्या ७ दिवसांनंतर आरोपी निष्पन्न झाला होता. पण या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला काय शिक्षा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
advertisement
या प्रकरणाची सुनावणी प्रथम बाल न्यायालयासमोर चालली. त्यानंतर जेजे अॅक्टनुसार आरोपीचा समजुतदारपणा आणि वागणूक तपासण्यात आली. यावर बाल न्याय मंडळाच्या प्रोबेशनरी ऑफिसरचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला. न्यायालयाने मुलास 'प्रौढ' समजण्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर नियमित खटला चालला. यानंतर सत्र न्यायालयाने आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपीला अटक केल्यापासून पुण्याच्या निरीक्षण गृहात ठेवलं होतं. आता त्याला हर्सूल कारागृहात हलवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीचे सध्याचं वय २१ वर्षे आहे. निरीक्षण गृहातील कालावधी त्याच्या शिक्षेतून कमी होईल. खरं तर, 'निर्भया' प्रकरणानंतर बाल न्याय हक्क कायद्यात बदल झाला होता. बोन टेस्टनुसार आरोपीचे समजूतदारपणाचे वय प्रौढ गृहीत धरले जाते, हे या निकालात महत्त्वाचे ठरले, अशी माहिती अॅड. अभयसिंह भोसले यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगर: उच्चभ्रू सोसायटीत रक्तरंजित थरार, डोक्यात डंबल घालून प्राध्यापकाची हत्या, कोर्टाकडून अल्पवयीन मुलाला मोठी शिक्षा
Next Article
advertisement
Mahayuti : शिंदे गट–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी, महायुतीचा महापालिकेचा फॉर्म्युला ठरला
शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर
  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

View All
advertisement