डहाणूत अमानुष कृत्य! कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक; परिसर हादरला
Last Updated:
Newborn Baby Found Dead : डहाणू येथे कचऱ्यात मृत अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कोणत्या परिस्थितीत अर्भक टाकण्यात आले याची चौकशी जोरात सुरू आहे.
डहाणू : डहाणूतील एका गावात बुधवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संताप आणि दुःखाची लाट पसरली असून अशा आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
माणुसकीला काळिमा
पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना कचऱ्याजवळ काहीतरी संशयास्पद दिसले. जवळ जाऊन पाहिल्यावर ते नवजात अर्भकाचे असल्याचे दिसले. हा प्रकार उघड होताच तात्काळ डहाणू पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वाणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी तुषार पाचपुते आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
अर्भकाचा मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अर्भकाच्या जन्मानंतर काही तासांतच किंवा लगेचच कचऱ्यात टाकण्यात आले असावे. थंडी, भूक किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गुदमरून अर्भकाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा क्रूर आणि अमानुष घटनेमुळे परिसरात संताप पसरला आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 3:23 PM IST


