Video: पालघरमधील सोसायटीच्या निवडणुकीत बेक्कार राडा, मेंबर्समध्ये पोलिसांसमोरच फ्री स्टाईल मारहाण
- Published by:Prachi Amale
- Reported by:Ramesh Patil
Last Updated:
सोसायटीच्या निवडणुकीत भयंकर राडा झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत सदस्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ठाणे : या ना त्या मुद्यावरून सोसायट्यांमध्ये कधी वाद पेटेल याचा नेम नाही. अशातच पालघरच्या बोईसर जवळील परनीळा येथील साने गुरुजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या निवडणुकीत मोठा राडा झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की दोन गटात जोरादार मोठा राडा झाला. दोन गटात हाणामारी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. उमेदवारी, मतदानातील गैरप्रकार आणि प्रचाराबाबत झालेल्या वादातून वातावरण तणावपूर्ण बनले होते. काही क्षणांतच हा वाद हाताबाहेर गेला आणि दोन्ही गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. महत्त्वाचे म्हणजे ही घटना पोलिसांसमोरच घडली आहे. या वादात तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांना डोक्याला आणि अंगावर गंभीर मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
advertisement
परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच तारापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसमोरच हाणामारी सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवून जमावाला हटवले आणि परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू
advertisement
या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. हाणामारीस जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाद सोडवण्यासाठी कर्तव्यावर असलेले पोलीसमध्ये पडले असता त्यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली.
परिसरात भीतीचे वातावरण
view commentsदरम्यान, निवडणुकीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे परनाळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून विशेष सतर्कता बाळगली जाणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 24, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Video: पालघरमधील सोसायटीच्या निवडणुकीत बेक्कार राडा, मेंबर्समध्ये पोलिसांसमोरच फ्री स्टाईल मारहाण


