advertisement

Ambernath News: भटक्या कुत्र्यांची अंबरनाथमध्ये दहशत, हल्ल्यामध्ये शाळकरी मुलगी गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण

Last Updated:

अंबरनाथ पश्चिमेतील वांद्रापाड्यामध्ये एक शाळकरी मुलगी तिच्या भावासोबत घरी जात असताना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. हल्ल्यामध्ये भावाला वाचवण्यासाठी धाडसाने भटक्या कुत्र्याला सामोरे जाताना स्वतः गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Diva News: Diva: 5 वर्षीय निशाचा स्वतःला घेऊ लागली चावा, डॅाक्टरही काही करू शकले नाही; चिमुरडीचा करूण अंत
Diva News: Diva: 5 वर्षीय निशाचा स्वतःला घेऊ लागली चावा, डॅाक्टरही काही करू शकले नाही; चिमुरडीचा करूण अंत
अंबरनाथ: भटक्या कुत्र्यांनी एका शाळकरी मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ पश्चिमेतील वांद्रापाड्यामध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय शाळकरी मुलीवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तिच्यासोबत तिचा सहा वर्षांचा भाऊ सुद्धा होता. आपल्या भावाला वाचवण्यामध्ये 11 वर्षीय मुलीवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये ती शाळकरी मुलगी गंभीर जखमी झालीये. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंगळवारी सकाळी अंबरनाथ पश्चिमेतील वांद्रापाडा परिसरामधील ही घटना आहे. भटक्या कुत्र्याने 11 वर्षीय शाळकरी मुलीवर हल्ला केला होता. ती तिच्या 6 वर्षीय भावासोबत घरी परतत असताना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. NCMIndia Council For Men Affairs ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, वंशिका नागर नावाची शाळकरी मुलगी तिच्या भावासोबत घरी जात असताना अचानक कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. दोघंही भाऊ- बहिण जात असताना, त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. अचानक पाठीमागून येऊन त्याने वंशिकावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 11 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अचानक कुत्र्याने तिच्यावर अंगावर उडी मारल्यामुळे ती घाबरली होती. तिने त्याच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्याने तिच्यावर हल्ला केला.
advertisement
advertisement
कुत्र्याने शाळकरी मुलीवर हल्ला केल्यानंतर लगेचच ती फार जोरजोरात किंचाळली सुद्धा. तरीही कुत्र्याने तिला सोडलं नाही. अखेर तिथले काही स्थानिक लोकं तिच्या मदतीला आल्यानंतर कुत्र्याने तिकडून पळ काढला. दरम्यान, कुत्र्याने शाळकरी मुलीचा चावा घेतल्यानंतर लगेचच तिला परिसरातल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलीवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षीय शाळकरी मुलीवर सध्या अंबरनाथमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भटक्या कुत्र्यांविषयी भीती आणि संताप निर्माण झाला असून, ते आता मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची मागणी करत आहेत.
advertisement
दरम्यान, अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर वांद्रापाडा परिसरातील 18 मोकाट कुत्र्यांना पकडले असले तरी, मुलीवर हल्ला करणाऱ्या उपद्रवी कुत्र्याला अद्यापही ताब्यात घेतलेले नाही. अजूनही नगरपालिकेचे कर्मचारी त्या कुत्र्याच्याच शोधात आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव बराच वाढला आहे. त्यामुळे नागरिकांकडून या भटक्या कुत्र्यांवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षात घेता, संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Ambernath News: भटक्या कुत्र्यांची अंबरनाथमध्ये दहशत, हल्ल्यामध्ये शाळकरी मुलगी गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement