advertisement

TMC News: ठाणे पालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता या दिवशी मिळणार

Last Updated:

ठाणे महानगरपालिका आणि परिवहन सेवा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता वितरित केला जाणार असल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली.

News18
News18
ठाणे महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे खऱ्या अर्थाने ठाणे महापालिकेतल्या सर्वच कर्मचाऱ्यांचे नवीन आर्थिक वर्ष आनंदीत जाणार, हे नक्की. ठाणे महानगरपालिका (TMC) आणि परिवहन सेवा (TMT) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता वितरित केला जाणार असल्याची घोषणा ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज (28 मार्च शनिवार) केली.
अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिकेच्या महापौरांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. महापौर पिंपळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना त्यांची पगारातील थकबाकी देणी फेडण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची पगारातली थकबाकी 30 मार्च 2026 पर्यंत कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तीन हप्त्यांचे एकत्रित वाटप टीएमटी कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे. 
advertisement
कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यातच हे पैसे येणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही कागदपत्र जमा करावे लागणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सुरुवातीला 12%- 15%ची पगारवाढ झाली असली तरी, सहा वर्षांतील पगारातील तफावत पाच टप्प्यांत वितरित करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी दोन हप्ते अदा करण्यात आले असून, सध्याच्या घोषणेद्वारे प्रलंबित असलेल्या रकमेबाबतच्या वाढत्या असंतोषावर तोडगा काढण्यात आला आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि इतर वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा उद्देश कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
TMC News: ठाणे पालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता या दिवशी मिळणार
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement