Thane Metro: गुड न्यूज! अख्ख्या ठाण्यात वर्तुळाकार मेट्रोचं जाळं विणणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती

Last Updated:

Thane Metro: ठाण्यामध्ये आता वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या मेट्रो प्रकल्पामुळे ठाणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे.

Thane Metro: गुड न्यूज! अख्ख्या ठाण्यात वर्तुळाकार मेट्रोचं जाळं विणणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Thane Metro: गुड न्यूज! अख्ख्या ठाण्यात वर्तुळाकार मेट्रोचं जाळं विणणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांना कायमच वाहतूक कोंडीमध्ये प्रवास करावा लागतो. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सध्या एमएमआरडीए कडून मेट्रोंचं जाळं विणलं जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे रिंग मेट्रो 3 ची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व गोष्टी बरोबर सुद्धा होत्या. त्यानंतर, मेट्रो लवकरच सुरू होणार अशी माहिती सुद्धा आली होती. तयार असलेली मेट्रो अद्याप सुरू नाही झालीये, तिच आता एमएमआरडीएकडून नवीन मेट्रोची घोषणा करण्यात आलीये. ठाण्यामध्ये आता वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या मेट्रो प्रकल्पामुळे ठाणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महा मेट्रोने 223.70 कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे. निविदेअंतर्गत हा प्रकल्प 29 किलोमीटरचा मेट्रो कॉरिडॉर असेल जो ठाणे जंक्शनपासून सुरू होऊन तिकडेच संपणार आहे. हा संपूर्ण मेट्रोचा वर्तुळाकार मार्ग असेल. या मेट्रो प्रकल्पामुळे वागळे इस्टेट, मानपाडा, वाघबीळ, बाळकुम, कोलशेत, साकेत, डोंगरी पाडा, नौपाडा, आणि हिरानंदानी इस्टेट यांसारख्या ठाण्यातील महत्त्वाच्या अंतर्गत भागांना थेट मेट्रो जोड मिळणार आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होऊन वेळेची मोठी बचत होणार आहे.
advertisement
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ आणि वॉटरफ्रंट या ठिकाणी उन्नत मेट्रो स्थानकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. संपूर्ण मेट्रोचा मार्ग पाहता लवकरच ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मार्गाची एकूण लांबी 29 किलोमीटर असून, या मार्गावर एकूण 22 मेट्रो स्थानके असतील. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 6 स्थानकांचे काम पूर्ण केले जाणार आहे. संपूर्ण मार्गिकेंपैकी सुमारे 26 किलोमीटरचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) स्वरुपाचा असेल. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील दोन मेट्रो स्थानके भूमिगत (अंडरग्राउंड) असणार असून, त्यामुळे रेल्वे आणि मेट्रोमधील बदल (इंटरचेंज) अधिक सोपा होणार आहे.
advertisement
ठाणे शहरातच उच्च क्षमतेचा आणि जलद वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ठाण्यामधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि वर्तुळाकार मेट्रोचा मुंबई मेट्रो 4 आणि मेट्रो 5 मार्गिकांशी थेट संपर्क जोडण्याचा मानस आहे. त्यामुळे ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते कल्याण असा मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. या मेट्रोमुळे खरंतर उपनगरांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 2045 पर्यंत या मेट्रो मार्गिकेवरून दररोज सुमारे 8 लाख 70 हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणारा हा प्रकल्प सुमारे 12 हजार 200 कोटी रुपये खर्चाचा असून, ठाण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Metro: गुड न्यूज! अख्ख्या ठाण्यात वर्तुळाकार मेट्रोचं जाळं विणणार; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement