अखेर! ठाण्यातील PSI दिनकर यांचा कुटुंबाला न्याय मिळाला, न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

Last Updated:

Thane News : कर्तव्यावर जात असताना अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर यांच्या कुटुंबाला न्यायालयाने 1.25 कोटींची भरपाई मंजूर केली.

News18
News18
ठाणे : कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण बाईक अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे मोटार अपघात न्यायालयाने त्यांच्या वारसांना एक कोटी 25 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. हा निर्णय शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीत झालेल्या समेटानंतर देण्यात आला.
घडलं काय होत?
प्रवीण अशोक दिनकर (वय 47) हे ठाणे येथे वास्तव्यास होते आणि मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. 14 एप्रिल 2023 रोजी ते दुचाकीवरून कर्तव्यावर जात असताना एका बेस्ट बसने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या पत्नीने ठाणे मोटार अपघात न्यायालयात भरपाईसाठी दावा दाखल केला होता. हा दावा विमा कंपनी आणि मृत पोलिस अधिकाऱ्याच्या वारसांमध्ये तडजोडीने निकाली काढण्यासाठी 13 डिसेंबर रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीसमोर ठेवण्यात आला.
advertisement
राष्ट्रीय लोकअदालतीत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाल्यानंतर तडजोड झाली. यामध्ये विमा कंपनीने एक कोटी 25 लाख रुपयांची भरपाई देण्यास सहमती दर्शवली. पीडित कुटुंबाच्या वतीने अॅड. रमेश पवळ यांनी तर विमा कंपनीच्या वतीने अॅड. पुजारी यांनी युक्तिवाद मांडला.
न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
मोटार अपघात न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. मोहिते यांच्या पॅनेलने हा निकाल दिला. या निर्णयामुळे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला असून न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
अखेर! ठाण्यातील PSI दिनकर यांचा कुटुंबाला न्याय मिळाला, न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement