Thane News: हे कशाचे परिणाम? मिसरूडं न फुटलेल्या पोराकडे सापडली पिस्तुल, किंमत ऐकून पोलीसही अवाक्

Last Updated:

Thane News: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे पोलिसांनी अवैध शस्त्रात्रे बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

Thane News: अवैध पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक, पोलिसांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
Thane News: अवैध पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक, पोलिसांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे पोलिसांनी अवैध शस्त्रात्रे बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाकडून ठाणे पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे जप्त केली आहेत, पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी पीटीआय वृत्तसंस्थेला अशी माहिती दिली. अल्पवयीन मुलाच्या हातात देशी बनावटीचे पिस्तूल आणि जीवंत काडतुसे मिळाल्यामुळे सध्या ठाणे आणि परिसरामध्ये पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आलेले पाहायला मिळत आहे.
पोलिसांना रविवारी मिळालेल्या एका माहितीच्या माध्यमातून, ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये पोलिसांनी एका फूटपाथवर सापळा रचून अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याची झाडाझडती घेतली असता पोलिसांना त्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळाले. ज्याची सध्याची किंमत 2 लाख 14 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अल्पवयीन मुलाकडे पिस्तुल बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता. त्याकडे सर्व अवैध शस्त्रात्रेच होते. महत्त्वाचं म्हणजे, तो हे शस्त्रात्र अवैध विकण्याच्या तयारीत होता, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांनी दिली.
advertisement
advertisement
कोणताही परवाना नसताना शस्त्रात्रे बाळगणारा हा अल्पवयीन मुलगा मुळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातल्या चित्रकुटमधील आहे. सध्या मुलाला ठाणे पोलिसांकडून होम रिमांडमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. असे वृत्त पीटीआयने दिले आहे. पोलिसांकडून या मुलाचे वय स्पष्ट करण्यात आले नाही. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तरमाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शस्त्रांचा साठा शोधण्यासाठी आणि शस्त्रांच्या बेकायदेशीर खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या नेटवर्कची ओळख पटवण्याचे तपास सुरू आहे."
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: हे कशाचे परिणाम? मिसरूडं न फुटलेल्या पोराकडे सापडली पिस्तुल, किंमत ऐकून पोलीसही अवाक्
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement