ठाणे-नाशिक-वसईकरांसाठी महत्त्वाची बातमी, घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
घोडबंदर घाट रस्त्यासह पर्यायी मार्गावरही वाहतुकीचा ताण येऊन ठाणे, भिवंडी, वसई कोंडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाणे : घोडबंदर येथील गायमुख रस्ता दुरुस्तीचे महत्त्वाच्या टप्प्यातील काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिका मिळून नव्याने दुरुस्ती करणार आहे. त्यामुळे 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत ही कामे केली जाणार असून अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी वाडा, मुंबई नाशिक महामार्ग, कशेळी काल्हेर या मार्गावर वळवावी लागणार आहे. तर हलकी वाहने एकेरी पद्धतीने घाटातूनच सोडावी लागणार आहेत. त्यामुळे घोडबंदर घाट रस्त्यासह पर्यायी मार्गावरही वाहतुकीचा ताण येऊन ठाणे, भिवंडी, वसई कोंडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आधीच घोडबंदर येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेने येथील गायमुख घाट परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडे परवानगी मागितली आहे. येथील गायमुख घाट रस्त्याचे सुमारे 500 मीटर लांबीचे काम केले जाणार आहे. या कालावधीत वाहनांचा भार वाढून कोंडीची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेने येथील गायमुख
घाट परिसरात रस्ते दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडे परवानगी मागितली. ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटाने दुरुस्ती कामाला सुरुवात केली जाईल.
advertisement
तात्पुरते नियम गायमुखघाट रस्ता दुरुस्ती
गायमुख घाटाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहने 12 ते 14 डिसेंबर या काळात भिवंडी-वाडा, मुंबई-नाशिक मार्गावर वळवण्यात आली होती, तर हलकी वाहने घाटातून एकेरी मार्गाने सोडली जात होती.
पर्यायी मार्ग:
मुंबई-नाशिक कडे जाणारी वाहने अंजूरफाटा येथून मानकोली मार्गे मुंबई-नाशिक महामार्गावर जातील. वाडा/गुजरात कडे जाणारी वाहने वडपे, चाविंद्रा, वंजारपट्टी उड्डाणपूल मार्गे जातील.
advertisement
रांजनोळी नाक्यावरून: रांजनोळी नाक्यावरून वाहने मुंबई-नाशिक बायपासवर मानकोली नाका, अंजूरफाटा किंवा वसईकडे वळतात.
नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली पुलाखालून अंजुर फाटा मार्गे जातील. हलकी वाहने घोडबंदर घाटातून रस्ते कामाच्या ठिकाणावरून विरुद्ध दिशेने वाहतूक करतील.
12 ते 14 डिसेंबर (तीन दिवस कामाचे)
view commentsठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जाहीर केली असून अधिसूचनेनुसार 12 डिसेंबरला मध्यरात्री 12.01 वाजता दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे. तर 14 डिसेंबरला रात्री 11.59 मिनिटांपर्यंत या कामासाठी परवानगी देण्यात आली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 09, 2025 8:37 AM IST


