Tatkal Ticket Booking Rules : आधार लिंकशिवाय ऑनलाइन रेल्वे तिकीट मिळणार नाही, नवे नियम काय?

Last Updated:

Ticket Booking New Rules: १ जुलैपासून आधार लिंकशिवाय ऑनलाइन तिकिटे बुक केली जाणार नाहीत, असा मोठा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.

रेल्वे तिकीट बुकिंग नवे नियम
रेल्वे तिकीट बुकिंग नवे नियम
नवी दिल्ली : आधार लिंकशिवाय ऑनलाइन रेल्वे तिकीट मिळणार नाही, असा मोठा निर्णय रेल्वे विभागाने घेतलेला आहे. रेल्वे विभागाने तिकीट प्रणालीत मोठे बदल केले आहेत. १ जुलैपासून नवीन नियम लागू होणार असल्याचे कळते.
त्यानुसार, १ जुलैपासून आधार लिंकशिवाय ऑनलाइन तिकिटे बुक केली जाणार नाहीत. या निर्णयामागील कारण म्हणजे बनावट आयडीद्वारे ऑनलाइन तिकिटांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीची प्रकरणे समोर येत होती. त्यामुळे आता आधार लिंकशिवाय ऑनलाइन रेल्वे द्यायची नाहीत, असा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

आता आधार आणि OTP वापरूनच तत्काळ तिकिटाची सुविधा मिळेल

जर तुम्ही आयआरसीटीसीवरून रेल्वे तिकिटे बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगबाबत मोठे बदल केले आहेत. रेल्वेचे प्रवक्ते दिलीप कुमार म्हणाले की, आता फक्त तेच प्रवासी तत्काळ तिकिटे बुक करू शकतील ज्यांचे आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक केले जाईल आणि पडताळले जाईल.
advertisement

नवीन नियम काय आहेत?

-१ जुलै २०२५ पासून, तत्काळ तिकिटे फक्त आधार पडताळलेल्या खात्यावरूनच बुक केली जातील.
-१५ जुलैपासून, बुकिंगच्या वेळी ओटीपी आधारित प्रणाली लागू होईल.
-तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी सिस्टममध्ये एंटर केला जाईल तेव्हाच तिकीट केले जाईल.
-तिकीट खिडकीवर (पीआर काउंटर) देखील हीच ओटीपी पडताळणी प्रणाली लागू केली जाईल.
advertisement
-काउंटरवरून तिकिटे काढतानाही आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

आयआरसीटीसी एजंट्सवरही कडक कारवाई

जर एसी क्लासचे बुकिंग सकाळी १० वाजता सुरू झाले तर पहिल्या ३० मिनिटांसाठी (म्हणजे १०:०० ते १०:३० पर्यंत) कोणताही एजंट तिकिटे बुक करू शकणार नाही. ही वेळ फक्त सामान्य प्रवाशांसाठी असेल. पूर्वी ही वेळ फक्त १० मिनिटांसाठी होती.
advertisement
तसेच, सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या नॉन एसी क्लासच्या बुकिंगमध्ये ११:०० ते ११:३० पर्यंतचा वेळ फक्त वैयक्तिक प्रवाशांसाठी राखीव असेल. या काळात एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत.

२.५ कोटी बनावट खाती ब्लॉक

रेल्वेने सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने अशी खाती ओळखण्यात आली आहेत जी वारंवार दुसऱ्यासाठी तिकिटे बुक करत होती. सुमारे २.५ कोटी आयआरसीटीसी खाती बंद करण्यात आली आहेत. आजही दररोज सुमारे २५ हजार लोक आधार कार्डद्वारे त्यांचे खाते पडताळून पाहत आहेत.
advertisement
रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की जर तुम्ही अद्याप तुमचे आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर करा, अन्यथा तुम्ही १ जुलैनंतर तत्काळ तिकिटे बुक करू शकणार नाही.
view comments
मराठी बातम्या/Utility/
Tatkal Ticket Booking Rules : आधार लिंकशिवाय ऑनलाइन रेल्वे तिकीट मिळणार नाही, नवे नियम काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement