तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का? RBI कडून समोर आली मोठी अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 50 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे, ज्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. सध्याच्या नोटा वैध राहतील. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या आहेत.
मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका मोठ्या घोषणेत सांगितले आहे की लवकरच बाजारात 50 रुपयांच्या नव्या नोटा पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, या नवीन नोटांवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. मल्होत्रा यांनी डिसेंबर 2020 मध्ये शक्तीकांत दास यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. आरबीआयने स्पष्ट केले आहे की सध्या वापरात असलेल्या सर्व 50 रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या वैध राहतील. नवीन नोटा जुन्या नोटांसोबतच वापरता येतील.
नवीन नोट कशी असेल?
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नवीन 50 रुपयांची नोट ही महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील सध्याच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच असेल. याचा अर्थ असा की नोटेचा आकार, रंग आणि त्यावरील चित्रे सारखीच राहतील. सध्याच्या ५० रुपयांच्या नोटेचा रंग फ्लोरोसेंट निळा असून त्यावर हंपी येथील रथाचे चित्र आहे जे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.
advertisement
2000 रुपयांची नोट कुठे गेली?
नोटबंदीनंतर सर्वात मोठी नोट ही 2000 रुपयांची काढण्यात आली. 100, 200 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतरही अजूनही मोठ्या प्रमाणात नोटा लोकांकडे आहेत. 31 जानेवारी 2023 पर्यंत 98.15 टक्के 2000 च्या नोटा बँकांकडे परत आल्या आहेत, अजूनही 6,577 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे शिल्लक आहेत.
advertisement
2000 रुपयांच्या बनावट नोटा
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 200 रुपयांच्या या नोटेबाबतही चिंता वाढत आहे. देशात बनावट नोटी पुन्हा बाजारात आल्या असल्याच्या बातम्या आहेत. सुरवातीला 500 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्या होत्या मात्र आता 200 रुपयांच्या बनावट नोटाही बाजारात आल्या आहेत.बनावट नोटा या अगदी खऱ्या नोटांसारख्या दिसतात, त्यामुळे लोकांची सतत फसवणूक होत असते. 200 रुपयांच्या बनावट नोटांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आरबीआयने लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि व्यवहार करताना त्यांची योग्य प्रकारे तपासणी करा. कुणालाही बनावट नोटा आढळून आल्यास त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2025 2:08 PM IST