नाशिक ग्रामीण मधील 6 मतदारसंघात यंदा चांगलं मतदान झालंय... नाशिक ग्रामीण मधील नांदगाव, येवला आणि चांदवडमध्ये 70 टक्क्यांहून जास्त मतदान झालंय.. नांदगावात 79.70 टक्के मतदानाची नोंद झालीये. तर येवल्यात 74 टक्के आणि चांदवडमध्ये 75 टक्के नागरिकांनी मतदानाची नोंद झालीये... बागलाणमध्ये तुलनेने कमी 65 टक्के मतदान झालंय. दुसरीकडे मालेगाव बाह्यमध्ये 67 .54 टक्के मतदान झालं असून मालेगाव मध्यमध्ये 69.69 टक्के मतदानाची नोंद झालीये.. त्यामुळे नाशिकमध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे आता 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे..
Last Updated: November 21, 2024, 14:18 IST