महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यांचे निकाल रविवारी 21 डिसेंबर रोजी लागले. त्यातील विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी आपआपल्या हटके स्टाइलने विजयाचे सेलिब्रेशन केले होते. अकलूज नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विरुद्ध निवडणुक लढवली होती. तेव्हा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या स्टाइलमध्ये गाण्यावर डान्स केला आणि धुरंधर चित्रपटातील "घायल हू इसलिये घातक हू" हा डायलॉग म्हणत विरोधी पक्षावर निशाणा साधला.त्यांच्या या विजयाचा सेलिब्रेशन व्हीडिओ खूपच व्हायरल झाला
Last Updated: Dec 22, 2025, 16:07 IST


