सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत पवार कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. इतका महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबीयांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये अजित पवार हेच प्रामुख्याने सक्रिय होते, अशी माहितीही समोर आली आहे.



