मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाच्या वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे.इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार मानला जातो.त्याची निर्यात थांबली आहे.त्यातच कांदा, केळी इतर फळे निर्यात थांबली गेली. पर्यटन व्यवसायाला या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. अनेक व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील निर्यातदारांवरही झाला आहे. जालना, मुंबई, नाशिक आणि नागपूर येथून दुबईकडे जाणारी कांदा, मका, मिरची, टोमॅटो आणि डाळिंबाची निर्यात सध्या ठप्प झाली आहे.



