उल्हासनगरमध्ये एका दुकानात काम करत असताना स्वतःचा काहीतरी व्यवसाय हवा, या उद्देशाने विठ्ठल संते यांनी 11 हजार रुपयांपासून घरातूनच छोटासा व्यवसाय सुरू केला. आज यामध्ये त्यांनी लहान मुलांच्या छोट्या- मोठ्या वस्तू तसेच स्त्रियांच्या अलंकारापासून ते मयताच्या केफनापर्यंत सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी आल्यावर गिऱ्हाईक हव्या असलेल्या वस्तू अगदी कमी भावात खरेदी करू शकतो. यांच्या या घरगुती दुकानाचा फायदा कल्याण मधील अनेक गावांना होताना दिसतो.
Last Updated: November 19, 2025, 14:31 IST