पुणे : आपल्याकडे अशी मान्यता आहे की झाडू जिथे फिरतो, तिथे लक्ष्मी वास करते, असं असूनही स्वच्छता कामगार दुर्लक्षित का राहतात? एखाद्या नेत्याने स्वच्छता मोहीम हाती घेतली, तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र झळकतात, पण दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता कामगारांना तो सन्मान कधी मिळणार? आज आपण स्वच्छता कामगारांविषयी जाणून घेणार आहोत त्यांच्या अडचणी, मेहनत आणि त्यांच्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल