भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू, सांगलीची कन्या स्मृती मानधना आणि पालाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगली पार पडत आहे. विवाह सोहळ्यासाठी सांगलीतील मानधना यांच्या फार्म हाऊस वर जोरदार तयारी सुरू आहे. आज सायंकाळी हळदीचा समारंभ होणार आहे. यासाठी महिला क्रिकेट संघातील खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत. स्मृतीचा होणारा पती पलाश याची देखील दमदार एन्ट्री आज या ठिकाणी झाली. ढोल ताशाच्या निनादात त्याचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.
Last Updated: November 21, 2025, 16:56 IST