नाशिक: इतरांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी उद्योग असावा, हे स्वप्न अनेकजण पाहतात. पण नाशिकच्या एका उच्चशिक्षित तरुण दाम्पत्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या गौरव जाधव आणि मानसी जाधव यांनी नोकरीची वाट न धरता मिलेट कुकीज निर्मितीचा व्यवसाय सुरू केला असून, आज या व्यवसायातून ते महिन्याकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.



