अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम नेते अय़ातुल्लाह अली खामेनी ठार झाले. इराणी मीडिया आणि प्रेस टीव्हीने निधनाचा दावा केलाय.अमेरिका आणि इस्रायल जवळपास दोन महिन्यांपासून दोन समांतर मार्गांवर काम करत होते. एका बाजूला इराणसोबत चर्चा सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला गुप्तपणे मोठ्या लष्करी कारवाईची तयारी सुरू होती.Axios च्या अहवालानुसार शनिवारी सकाळी तेहरानमध्ये खामेनेई आपल्या सरकारी संकुलात सल्लागारांसोबत बैठक घेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या मोठ्या कारवाईची त्यांना किंचितही कल्पना नव्हती, असे सांगितले जाते. त्यामुळेच या ऑपरेशनला आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वाधिक गुप्त लष्करी कारवाई मानले जात आहे.



