advertisement

Israel Hamas War : हमाससोबत युद्ध सुरू असतानाच 6 हजार भारतीय इस्रायलला जाणार; समोर आलं मोठं कारण

Last Updated:

इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 6 हजार भारतीय इस्रायला जाणार आहेत.

News18
News18
जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात सहा हजार भारतीय इस्रायलला जाणार आहेत. इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असतानाच इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात कामगारांची कमतरता भासू लागली आहे. ही कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी आता सहा हजार भारतीय कामगार इस्रायला जाणार आहेत. हे कामगार एप्रिल आणि मे महिन्यात इस्रायलला जाणार आहेत. इस्रायल सरकारने बुधवारी रात्री उशिरा याबाबत एक स्टेटमेंट जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, कामगारांना इस्रायलमध्ये आणण्यासाठी इस्रायली पंतप्रधान कार्यालय, वित्त मंत्रालय आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या वतीनं चार्टर फ्लाइटला सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इस्रायलमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. इस्रायच्या बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार हे गाझा पट्टीतून आलेले आहेत. मात्र हमाससोबत युद्ध सुरू झाल्यानंतर यातील अनेक कामगारांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 17 हजार कामगार हे पु्न्हा एकदा गाझा पट्टीत परतल्यानं इस्रायलमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भारतीय कामगार इस्रायला जाणार आहेत.
advertisement
इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रात मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक सरकारी प्रकल्प रखडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या G2G करारांतर्गत भारतीय कामगार आता इस्रायला जाणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Hamas War : हमाससोबत युद्ध सुरू असतानाच 6 हजार भारतीय इस्रायलला जाणार; समोर आलं मोठं कारण
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement