60 जणांना घेऊन जाणारं विमान हेलिकॉप्टरला धडकलं, हवेत उडाला आगीचा भडका, धडकी भरवणारा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Plane and Military Helicopter Crashed: वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आणि यूएस आर्मीचे हेलिकॉप्टर धडकले. विमानात 60 प्रवासी होते.
दिल्ली: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये धडक झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर दोन्ही एअरक्राफ्ट आगीचे गोळे बनले. तर प्रवासी विमान नदीत कोसळलं आहे. विमानात सुमारे 60 प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. हे विमान अमेरिकन एअरलाइन्सचे होते. वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसजवळ हा अपघात झाला असून विमान पोटोमॅक नदीत पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी विमान अमेरिकेतील कॅन्सस सिटीहून वॉशिंग्टनला येत होते. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने एका निवेदनात म्हटले आहे की, वॉशिंग्टन डीसीच्या रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ उतरण्यापूर्वी विमान हवेतच यूएस आर्मीच्या सिरोस्की एच-60 हेलिकॉप्टरला धडकलं. अपघातानंतर हे विमान पोटोमॅक नदीत कोसळले.
विमानात होते 60 प्रवासी
सीएनएनच्या वृत्तानुसार, कॅन्ससमधील अमेरिकन सिनेटर रॉजर मार्शल यांनी सांगितलं की, ज्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमान धडकले आहे, ते हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्याचे होते. तसेच, विमानात 60 लोक होते. मार्शल यांनी X अकाऊंटवर लिहिलं की, 'बुधवारी आम्हाला दु:खद बातमी मिळाली. ही बातमी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. सुमारे 60 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान वॉशिंग्टन डीसीमधील रीगन विमानतळावर लँडींग करत होतं. यावेळी हवेतच विमानाची धडक लष्करी हेलिकॉप्टरला बसली आहे.
advertisement
BREAKING: Video shows 2 aircraft colliding over the Potomac River in Washington, D.C. pic.twitter.com/vVcyThS8Lr
— BNO News (@BNONews) January 30, 2025
सर्व उड्डाणे रद्द
view commentsसोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये रीगन विमानतळावर उतरताना विमान एका हेलिकॉप्टरला कसे धडकले आणि नंतर नदीत पडले हे दाखवण्यात आले. या घटनेनंतर वॉशिंग्टन विमानतळावरील सर्व उड्डाणे रोखण्यात आली आहेत. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर येत आहे. यात विमान हवेतून विमानतळावर लँडींग करताना दिसत आहे. मात्र विमान हवेत असताना विमानाच्या मार्गात लष्कराचं हेलिकॉप्टर येतं आणि दोन्ही एअरक्राफ्टची हवेतच धडक होते. अपघातानंतर आकाशात मोठा आगीचा भडका झाल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
Location :
Delhi
First Published :
January 30, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
60 जणांना घेऊन जाणारं विमान हेलिकॉप्टरला धडकलं, हवेत उडाला आगीचा भडका, धडकी भरवणारा VIDEO


