Abu Qatal Sindhi : हाफिज सईदचा 'राईट हँड', ज्याच्याशिवाय दहशतवाद्यांचा पानही हालत नव्हतं, अबू कतालचा गेम कसा झाला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Abu Qatal Sindhi Killed in Pakistan : लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानमधूल पंजाब प्रांतात त्याची हत्या केली गेली.
Pakistan LeT Terrorist Abu Qatal Sindhi Killed : गेल्या काही दिवसांपासून भारताविरुद्ध कारवाई करणाऱ्या दहशतवाद्यांच्या मृत्यूची संख्या अचानक वाढत असताना आता पाकिस्तानमधून गुड न्यूज आली आहे. लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. पंजाब प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. अबू कताल हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता. लष्कर-ए-तोयबाचा महत्त्वाचा सदस्य असलेला अबू कताल जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांचा कट रचण्यात सामील होता. अशातच आता एका अज्ञात व्यक्तीने दहशतवाद्याला कंठस्थान घातलंय.
हाफिज सईदचा राईट हँड
अबू कताल हा हाफिज सईदचा राईट हँड मानला जातो. तसेच लष्कर-ए-तोयबाचे अनेक व्यव्हार देखील तोच बघत असल्याची माहिती होती. गेल्या वर्षी 9 जून रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यातही कतालचा सहभाग होता. शिवखोडी मंदिरातून परतणाऱ्या 10 यात्रेकरूंना या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावावा लागला होता. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांचा कट रचण्यात देखील कतालचा हात होता.
advertisement
अबू कतालचा गेम कसा झाला?
काल रात्री 8 वाजता झेलम पीओके येथे अबू कतालची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी अबू कतालवर अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पाकिस्तानी मीडियामधून समोर आली आहे. पीओकेमध्ये बसून तो जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत हल्ले करत होता. हाफिजने कतालला लष्कराचा मुख्य ऑपरेशनल कमांडर बनवलं होतं. मात्र, आता अज्ञातांनी हाफिजने कतालचा गेम केल्याने हाफिज सईद लपून बसला आहे.
advertisement
अबू कताल होता कोण?
दरम्यान, अबू कताल याचं खरे नाव झियाउर रहमान होतं, परंतु त्याला नदीम आणि कताल सिंधी या नावांनीही ओळखलं जात होतं. तो पाकिस्तानातील सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील एका गावाचा रहिवासी होता. वयाच्या 42 व्या वर्षी पोहोचेपर्यंत त्याने दहशतवादाच्या अनेक कथा लिहिल्या होत्या. लष्कर-ए-तैयबाने त्याला जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी भागात दहशत पसरवण्याची जबाबदारी दिली होती. अबू कतालचे दहशतवादी नेटवर्क पाकिस्तानपासून काश्मीरपर्यंत पसरले होते. दहशतवाद्यांमध्ये आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ऑपरेटर्समध्ये दुवा म्हणून तो काम करायचा, अशी माहिती देखील होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 16, 2025 12:28 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Abu Qatal Sindhi : हाफिज सईदचा 'राईट हँड', ज्याच्याशिवाय दहशतवाद्यांचा पानही हालत नव्हतं, अबू कतालचा गेम कसा झाला?


