AI च्या धोक्यांबद्दल बोलता यावं म्हणून गुगलला केला रामराम, आता मिळाले नोबेल; कोण आहेत 'AIचे गॉडफादर'
- Published by:Suraj
Last Updated:
जेफ्री हिंटन यांनी आपल्या शोधाबद्दल बोलताना म्हटलं की, आमच्या संशोधनामुळे कामाच्या आणि जगण्याच्या पद्धतीत क्रांती घडतेय पण नवे धोकेही निर्माण होतील.
दिल्ली : एआयचे प्रणेते असणाऱ्या जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन या दोघांना भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. एआय सक्षम होऊन मशिन लर्निंगचे बिल्डिंग ब्लॉक्स तयार करण्यास मदत करणारा शोध लावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, जेफ्री हिंटन यांनी आपल्या शोधाबद्दल बोलताना म्हटलं की, आमच्या संशोधनामुळे कामाच्या आणि जगण्याच्या पद्धतीत क्रांती घडतेय पण नवे धोकेही निर्माण होतील. जेफ्री यांना एआयचे गॉडफादर असंही म्हटलं जातं.
जेफ्री हे कॅनडातल्या टोरंटो विद्यापीठात काम करतात. त्यांनी हॉपफिल्ड यांच्यासोबत मिळून मशिन लर्निंगचा पाया असलेली पद्धत विकसीत केली. एआयचे जसे फायदे आहेत तसे काही धोकेही असल्याचं जेफ्री हिंटन यांनी याआधी सांगितलंय.
एआयबद्दल बोलता यावं म्हणून गुगलचा राजीनामा
जेफ्री हिंटन गुगलमध्ये कार्यरत होते. पण एआय तंत्रज्ञान विकसीत केल्यानंतर त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहे. या तोट्यांबद्दल स्पष्ट आणि मोकळेपणाने बोलता यावं यासाठी जेफ्री यांनी गुगलचा राजीनामा दिला होता.
advertisement
एआयची औद्योगिक क्रांतीशी तुलना
नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना जेफ्री यांनी म्हटलं की, मला हा पुरस्कार मिळेल याची किंचितही कल्पना नव्हती. एआयचा मानवी संस्कृतीवर मोठा प्रभाव असेल आणि त्याच्या वापराने उत्पादकता आणि आरोग्य सेवेत मोठी सुधारणा होईल. याची आपण औद्योगिक क्रांतीशी तुलना करू शकतो.
एआयमुळे लोकांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल
view commentsएआयमुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. वाईट गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे नियंत्रणाबाहेर जाऊ नये याची काळजी घेण्याची गरज जेफ्री हिंटन यांनी व्यक्त केली. एआयमुळे लोकांच्या शारीरिक नाही तर बौद्धिक क्षमतेत वाढ होणार असल्याचंही हिंटन म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2024 8:52 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
AI च्या धोक्यांबद्दल बोलता यावं म्हणून गुगलला केला रामराम, आता मिळाले नोबेल; कोण आहेत 'AIचे गॉडफादर'


