whisky Price in pakistan : बूंद बूंद के लिए तरसेगा! जॉनी वॉकर ते ब्लू लेबल पाकिस्तानमध्ये एका बाटलीची किंमत किती?

Last Updated:

भारताने पाकिस्तानचे नापाक इरादे हाणून पाडले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना तिथे दारूची किंमत खूपच जास्त आहे. जॉनी वॉकरची किंमत 24811 पाकिस्तानी रुपये आहे.

News18
News18
मुंबई: पाकिस्तानचे नापाक इरादे भारताने हाणून पाडले. भारत पाकिस्तान संघर्षात अखेर पाकिस्तानला नमतं घ्यावं लागलं आणि संघर्ष थांबला. मोदी सरकारने पाकिस्तानची कोंडी केली. पाकिस्तानच्या अनेक सोशल मीडिया हॅण्डलवर बंदी घातली. आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना तिथल्या तळीरामांना धक्का देणारी बातमी आहे.
पाकिस्तानमध्ये दारूसाठी अत्यंत कठोर नियम आहेत, जे देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित आहेत. भारतात जिथे 16 कोटी लोक दारू पितात, तिथे पाकिस्तानमध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामागे आणखी एक कारण म्हणजे याच्या किंमती तिथल्या सर्वसामान्य लोकांना कदाचित परवडणाऱ्या नसाव्यात, पाकिस्तानात जॉनी वॉकर ते ब्लॅक लेबल यांसारख्या प्रसिद्ध विदेशी दारूच्या बाटलीची किंमत किती आहे ते जाणून घेऊया?
advertisement
पाकिस्तानमध्ये दारूची विक्री आणि वापराला कडक मनाई आहे. 1979 मध्ये जनरल जिया-उल-हक यांच्या इस्लामी शासनादरम्यान दारूबंदी अधिक कठोर करण्यात आली. इस्लामी कायद्यांनुसार, मुस्लिमांना दारू पिणे पूर्णपणे नियमांचं उल्लंघन करणारं आहे. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानात येणारे विदेशी नागरिकही विमानतळावरील ड्यूटी फ्री शॉपमधून दारू खरेदी करू शकत नाहीत.
काही विशिष्ट परिस्थितीत गैर-मुस्लिम नागरिकांना दारू खरेदी करण्याची परवानगी आहे. विशेषतः सिंध प्रांतात, जिथे हिंदू, ख्रिश्चन आणि इतर गैर-मुस्लिम समुदायांना दारू खरेदी करण्याची मुभा आहे. मात्र, ही सवलतही पूर्णपणे नियंत्रित असते आणि सरकारद्वारे परवानाधारक दुकानांमधूनच दारू खरेदी करता येते. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये दारूची तीन ग्रॅम सोन्याएवढी आहे. पाकिस्तानात वोडकाची किंमत 726 भारतीय रुपये (पाकिस्तानी रुपयांमध्ये वेगळी असू शकते) आहे. तर, लॉकडाऊन दरम्यान एका व्यक्तीने व्हिस्की 6,355 रुपयांना खरेदी केली होती.
advertisement
जॉनी वॉकर- 24811 पाकिस्तानी रुपए
Macallan- 3077817 पाकिस्तानी रुपए
ब्लू लेबल- 35,000 से 50,000 पाकिस्तानी रुपये
Chivas Regal- 55,134 पाकिस्तानी रुपए
8 PM- 3000 पाकिस्तानी रुपए
पाकिस्तानमध्ये कायद्यानुसार दारूची उपलब्धता मर्यादित आहे, पण अवैध बाजारात तिची विक्री मोठ्या प्रमाणात होते. जे लोक कायदेशीररित्या दारू खरेदी करू शकत नाहीत, ते काळ्या बाजारातून जास्त किंमत देऊन दारू विकत घेतात. तिथे प्रसिद्ध दारुच्या किंमतींना सोन्याच्या भाव असतो. लोक पैसे खरेदी करून ते विकतही घेतात हे विशेष आहे.
मराठी बातम्या/विदेश/
whisky Price in pakistan : बूंद बूंद के लिए तरसेगा! जॉनी वॉकर ते ब्लू लेबल पाकिस्तानमध्ये एका बाटलीची किंमत किती?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement