युद्ध इतक्यात थांबणार नाही, इराणमधून तातडीने बाहेर पडा; हवाई मार्ग बंद, बॉर्डरवर थांबले भारतीय विद्यार्थी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Israel-Iran War News Updates: इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने तातडीने हालचाल करत इराणमधील भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे. पहिला गट आर्मेनिया सीमेवर पोहोचला असून दूतावास सतत संपर्कात आहे.
तेहरान/नवी दिल्ली: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी मोहीम वेगवान करण्यात आली आहे. सर्वप्रथम इराणमधून सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारताने सोमवार (16 जून) पासून इराणमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 100 भारतीयांचा पहिला ताफा इराणमधून बाहेर काढण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की हे नागरिक आर्मेनिया सीमेवर पोहोचले आहेत. सोमवारी केंद्र सरकारने सांगितले की तेहरानमधील भारतीय दूतावास सतत सुरक्षेच्या परिस्थितीवर नजर ठेवून आहे.
इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की इराणचे हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आर्मेनियाच्या मार्गे बाहेर काढले जात आहे. आर्मेनियामधून त्यांना जॉर्जियामार्गे आणि मग पश्चिम आशियाच्या मार्गाने भारतात आणले जाऊ शकते. 110 विद्यार्थ्यांचा पहिला गट आर्मेनिया सीमेवर पोहोचला आहे.
advertisement
मी कंडोम करतो..., इस्रायल-इराण युद्धात हिरो होण्याच्या नादात देशाची लाज घालवली
माहितीनुसार, तीन विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यांना देखील हलवले जात आहे. इराणमध्ये सुमारे दीड हजार काश्मिरींसह सुमारे 10,000 भारतीय विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इराणमध्ये गेले आहेत.
दूतावासाने जारी केली एडवाइजरी
दरम्यान इराणमधील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली आहे. यात असे म्हटले आहे की जे भारतीय किंवा भारतीय मूळाचे लोक स्वतःच्या संसाधनांद्वारे तेहरानच्या बाहेर जाऊ शकतात, त्यांनी शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी निघून जावे. इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे, सर्व भारतीय नागरिक आणि पीआयओ (भारतीय मूळाचे व्यक्ती) जे स्वतःच्या संसाधनांचा वापर करून तेहरानमधून बाहेर जाऊ शकतात. त्यांना शहराबाहेर सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
भारत सरकार अलर्ट
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, तेहरानमधील भारतीय दूतावास सतत सुरक्षेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याशी संपर्क साधत आहे. काही विद्यार्थ्यांना दूतावासाच्या मदतीने इराणमधीलच सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. इतर शक्य पर्यायांवर देखील विचार केला जात आहे. यासंबंधी अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
इस्रायल आणि इराणमधील भारतीय दूतावासांनी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या X हँडलवरून सल्लागार सूचना जारी केल्या आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने X वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणमधील सद्यस्थिती लक्षात घेता येथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय मूळाच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावे. कोणत्याही अनावश्यक गोष्टींपासून दूर राहावे. दूतावासाच्या सोशल मीडिया खात्यांवर दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
युद्ध इतक्यात थांबणार नाही, इराणमधून तातडीने बाहेर पडा; हवाई मार्ग बंद, बॉर्डरवर थांबले भारतीय विद्यार्थी


