Breaking news : बस पुलावरून नदीत कोसळली, भीषण अपघातात 32 जण ठार
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भीषण अपघात झाला आहे, बस पुलावरून कोसळली, या अपघातामध्ये 32 जण ठार झाले आहेत.
दिल्ली प्रतिनिधी : मोठी बातमी समोर आली आहे. भीषण अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पुलावरून नदीत कोसळली. या अपघातामध्ये 32 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीये. मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य सुरू आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की हा अपघात पश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियनमध्ये घडला आहे. (Mali Bus Accident) ही बस मालियनहून बुर्किना फासोला निघाली होती. याचदरम्यान हा अपघात घडला आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला. अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीये, मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून बस पुलावरून नदीत कोसळली. या अपघातामध्ये तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव कार्य सुरू आहे.
advertisement
परिवहन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पश्चिमेकडील केनिबा शहराजवळ घडाला आहे. एका नदीवरील पुलावरून बस कोसळली. मंगळवारी झालेल्या या अपघातामध्ये 32 जण ठार झाले आहेत. या बसमधून मालियन आणि इतर प्रदेशातील नागरिक प्रवास करत होते. दरम्यान दीड महिन्यांपूर्वी देखील याच परिसरात असाच एक भीषण अपघात झाला होता. बस आणि ट्रकची धडक झाली होती. या भीषण अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Feb 28, 2024 8:45 AM IST









