Canada PM Justin Trudeau: अमेरिकेत ट्रम्प यांनी सूत्र हलवली, ट्रूडो यांचा राजीनामा, भारतीय शेअर मार्केटवर होणार परिणाम?

Last Updated:

Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेचे पडसाद आज ग्लोबल तसेच आशियातील शेअर मार्केटवर दिसून येणार आहेत.

News18
News18
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेचे पडसाद आज ग्लोबल तसेच आशियातील शेअर मार्केटवर दिसून येणार आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा तर दिलाच सोबत पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. ट्रूडो यांच्यावर टीका होत असताना त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपला राजीनामा देत असताना ट्रूडो अनेक प्रश्न आणि अडचणी समोर ठेवून पायउतार झाले आहेत. त्यामुळे कॅनडातील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे.
राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया
ट्रुडो यांनी राष्ट्राला उद्देशून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पत्नी आणि मुलांशी दीर्घ चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. ''पक्षातील अंतर्गत वादामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. पक्षाला आणि देशाला नवी ऊर्जा आणि नेतृत्व देण्याची ही योग्य वेळ आहे, असं मला वाटतं.'' जस्टिन ट्रुडो नवीन नेत्याची निवड होईपर्यंत पदावर राहतील. ट्रुडो यांनी 2013 मध्ये लिबरल नेते म्हणून पदभार स्वीकारला. जस्टिन ट्रुडो 11 वर्षे लिबरल पक्षाचे नेते होते आणि नऊ वर्षे पंतप्रधानपद भूषवलं.
advertisement
ट्रूडो यांनी राजीनाम्यानंतर केली विनंती
ट्रूडो यांनी गव्हर्नर जनरल यांना 24 मार्चपर्यंत संसदेचे कामकाज तहकूब करण्याची विनंती केली. जेणेकरून पक्षाच्या नवीन नेत्याची निवड आणि सरकारच्या आगामी निर्णयांसाठी वेळ देता येईल. त्याच वेळी, ट्रूडो यांनी त्यांचे संभाव्य उत्तराधिकारी, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे यांच्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की कॅनडाचे नेतृत्व करण्यासाठी पॉइलिव्हरे योग्य व्यक्ती नाहीत. हवामान बदल आणि आर्थिक समस्यांवरील त्यांची मते देशासाठी धोकादायक ठरू शकतात.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांचा हात?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांना सतत ट्रोल करताना दिसले. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी ट्रुडो यांना अमेरिकेच्या 51 व्या राज्याचे गव्हर्नर म्हणून संबोधित केले. ट्रम्प यांच्या विधानाचा सरळ अर्थ असा आहे की ते कॅनडाला अमेरिकेतील 51 वे राज्य मानतात. इतकेच नाही तर ट्रुडो जेव्हा अमेरिकेत ट्रम्प यांना भेटायला आले होते तेव्हा ट्रम्प यांनी भेटीचा फोटो शेअर केला होता आणि त्यातही त्यांनी ट्रुडो यांचे वर्णन 'अमेरिकन स्टेट ऑफ कॅनडा'चे गव्हर्नर असे केले होते. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे ट्रुडो यांना कॅनडामध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. याशिवाय ट्रम्प यांनी कॅनडावर 25 टक्के शुल्क लागू करण्याची धमकीही दिली होती.
advertisement
देश आणि पक्षासाठी मी नेहमी उपलब्ध राहिन, मात्र आता मी नव्या नेत्याला संधी देऊ इच्छितो असंही ट्रूडो आपल्या भाषणात म्हणाले. नव्या नेतृत्वामुळे देश आणि पक्षा दोन्हीही नव्याने पुढे जातील असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. या घडामोडीनंतर जागतिक पातळीवर त्याचे कसे पडसाद उमटतात, भारत आणि कॅनडा संबंधांवर याचा कसा परिणाम होतो, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Canada PM Justin Trudeau: अमेरिकेत ट्रम्प यांनी सूत्र हलवली, ट्रूडो यांचा राजीनामा, भारतीय शेअर मार्केटवर होणार परिणाम?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement