एका हल्ल्याने जगाचा गेमप्लॅन बदलला, मॉस्कोत मोठी घोषणा; रशिया हा इराणचा विश्वासू मित्र, पुतिनसोबत चीन

Last Updated:

US Attack on Iran: अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या तीन अणुउद्योग केंद्रांवर भीषण हल्ला केला आणि त्यानंतर तणाव कमालीचा वाढला आहे. इराणने इस्रायलवर प्रतिहल्ला करताच, परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी पुतिनची भेट घेण्यासाठी मास्को गाठण्याची घोषणा केली.

News18
News18
तेहरान: रविवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या तीन अणुउद्योग केंद्रांवर बी-2 द्वारे अत्यंत शक्तिशाली 'बंकर बस्टर' बॉम्ब टाकले. या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलच्या 10 शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी जाहीर केले की ते सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मास्कोमध्ये बैठक घेणार आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री इस्तंबूलमधील पत्रकार परिषदेत म्हणाले, मी आज दुपारी मास्कोला रवाना होत आहे आणि उद्या सकाळी अध्यक्ष पुतिन यांच्याशी माझी भेट आहे. रशिया हा इराणचा विश्वासू मित्र आहे.
अमेरिकाचा इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला, मोदींचा तेहरानला कॉल; केली मोठी मागणी
या पार्श्वभूमीवर, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलीग्रामवर लिहिले की, “शांती स्थापनेसाठी अध्यक्ष झालेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेला नव्या युद्धात ढकलले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन लवकरच काबूलमध्ये परराष्ट्र मंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक घेणार असल्याचे अफगाण परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.
advertisement
इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी रविवारी स्पष्ट केले की, अमेरिकेने त्यांच्या अणुउद्योग केंद्रांवर हल्ला करून कूटनीतीचे सर्व मार्ग बंद केले आहेत. या हल्ल्यांनंतर आम्ही जे काही उत्तर देऊ. त्यासाठी पूर्णपणे वॉशिंग्टन जबाबदार असेल, असे ते म्हणाले.
त्यांनी असेही सांगितले की, अमेरिकेने अशी एकही ‘लक्ष्मणरेषा’ उरलेली नाही जी त्याने ओलांडलेली नाही. जरी कूटनीतीचा मार्ग नेहमी खुला ठेवावा असे आम्हाला वाटते, तरी आता तो मार्गच संपला आहे.
advertisement
अमेरिकेने केली सर्वात मोठी चूक, महायुद्धापेक्षा भयानक; बुश सारखे फसणार ट्रम्प
तुर्कस्तानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अराक्ची यांनी अमेरिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. अमेरिकेत सध्या युद्धखोर आणि अराजकवादी प्रशासन आहे. त्याचे आक्रमक कृत्य अत्यंत धोकादायक असून त्याचे दूरगामी परिणाम होतील. यासाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल, असे त्यांनी सांगितले.
इराणवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्यांनंतर परराष्ट्र मंत्री अराक्ची यांची ही पहिली अधिकृत प्रतिक्रिया आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेने अणुउद्योग केंद्रांवर हल्ला करून अखेरची आणि सर्वात धोकादायक लक्ष्मणरेषा पार केली आहे.
advertisement
त्यांच्या म्हणण्यानुसार, आता संघर्ष टाळण्याचा कोणताही शांततामय मार्ग शिल्लक राहिलेला नाही आणि अमेरिका याचे परिणाम भोगेल.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
एका हल्ल्याने जगाचा गेमप्लॅन बदलला, मॉस्कोत मोठी घोषणा; रशिया हा इराणचा विश्वासू मित्र, पुतिनसोबत चीन
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement