Japan Earthquake: आणखी एक देश भूकंपाच्या धक्क्याने हादरला, त्सुनामीचा हवामान विभागाचा इशारा

Last Updated:

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जपानमधील क्यूशू परिसर भूकंपाने हादरला. 6.0 तीव्रतेचा हा भूकंपाचा धक्का होता.

 (प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली: म्यानमारनंतर आता जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. जपानमधील क्यूशू परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी रिश्टेरल स्केलवर नोंद झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बिंदू हे क्यूशू बेटावर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जपानमधील क्यूशू परिसर भूकंपाने हादरला. 6.0 तीव्रतेचा हा भूकंपाचा धक्का होता. सुदैवाने आतापर्यंत भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. जपान हवामान विभागाच्या संस्थेनं सध्या भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा अलर्ट दिला आहे. क्यूशू जपानमधील तिसरा हा सर्वात मोठा बेट आहे. या बेटावर वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत असतात. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहणाच्या सूचना केली आहे.
advertisement
म्यानमार भूकंपात 2700 लोकांचा मृत्यू
दरम्यान, मागील आठवड्यात म्यानमारमध्ये  7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने म्यानमार आणि थायलंड हादरलं होतं. या भूकंपाचे धक्के भारत, बांगलादेश, चीन, लाओस आणि थायलंडमध्येही जाणवले होते. सुरूवातीच्या आकडेवारीनुसार भूकंपामध्ये 2700 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहे. तसंच थायलंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मशीद पडल्यामुळे 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा भूकंप एवढा तीव्र होता की बँकॉकमधील एक निर्माणधीन बहुमजली इमारत कोसळली आहे. या इमारतीमध्ये काम करणारे 43 मजूर अडकले आहेत. तर म्यानमारमध्ये अनेक ठिकाणी इमारती तसंच पूल कोसळले. 
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Japan Earthquake: आणखी एक देश भूकंपाच्या धक्क्याने हादरला, त्सुनामीचा हवामान विभागाचा इशारा
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement