पाकिस्तानच्या मास्टरस्ट्रोकने पलटी मारली; भारताला धडा शिकवण्याच्या नादात इज्जत तर गेलीच आता भीक मागण्याची वेळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India Pakistan Crisis: भारतीय सैन्याने पाकिस्तानला दोनदा धूळ चारली, तरीही त्यांची दहशतगर्दी थांबलेली नाही. पहलगाममधील हल्ल्याने त्यांचे खरे स्वरूप जगासमोर आले. तर मोदींच्या गर्जनेनंतर हवाई हद्द बंद करून पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे.
इस्लामाबाद : भारतीय सैन्याने पाकिस्तानला लागोपाठ दोन वेळा जोरदार धक्के दिले आहेत. पहिला धक्का 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला गेला. तर दुसरा 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकच्या रूपाने होता. जगासमोर पुरती नाचक्की झाल्यानंतरही पाकिस्तान आपल्या वाईट हरकती सोडायला तयार नाही. त्यांनी पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार करून आपले खरे स्वरूप दाखवून दिले आहे.
दुसरीकडे बिहारच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गर्जना ऐकल्यानंतर पाकिस्तान पुरता हादरला आहे. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने पुन्हा एकदा आपल्या छातीत घुसून हल्ला करतील, असे त्याला वाटले. याच भीतीने पाकिस्तानने कोणतीही विचारसरणी न करता भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली. जगासमोर आपली भीती लपवण्यासाठी पाकिस्तानने हे कृत्य अशा प्रकारे सादर केले. जणू काही त्याने भारताच्या विरोधात एखादा मोठा डाव खेळला असेल.
advertisement
पाकिस्तानला होत होती कोट्यवधींची कमाई
मात्र कंगाल झालेल्या पाकिस्तानला हे समजले नाही की ज्याला तो मास्टर स्ट्रोक समजत आहे. तोच डाव त्याच्यासाठी वाटोळ करणार आहे. वास्तविक पाहता 24 एप्रिलपूर्वी पाकिस्तानी हवाई हद्दीतून दररोज 100 ते 150 भारतीय विमाने जात होती. या बदल्यात पाकिस्तानला प्रत्येक विमानाच्या प्रकारानुसार 600 ते 800 अमेरिकन डॉलर मिळत होते. अशा प्रकारे भारतीय विमानांच्या मदतीने पाकिस्तान दररोज सुमारे 87,500 अमेरिकन डॉलरची कमाई करत होता.
advertisement
पाकिस्तानला दररोज बसत आहे एवढा फटका
पाकिस्तानी चलनानुसार बोलायचे झाल्यास ही रक्कम सुमारे 2.45 कोटी पाकिस्तानी रुपये होते. तर 24 एप्रिलपासून आजपर्यंत पाकिस्तानला सुमारे 17.20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे भारतीय विमानांचा मार्ग बदलताच पाकिस्तानी हवाई हद्द पूर्णपणे ओस पडली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी बंदीची पर्वा न करता भारतीय विमान कंपन्यांनी आपले दोन मार्ग शोधले आहेत. मार्ग बदलल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात थोडी वाढ झाली आहे.
advertisement
आता काय करणार कंगाल पाकिस्तान?
view commentsहा वाढलेला खर्च भारतीय विमान कंपन्या आणि प्रवासी सहजपणे सहन करू शकतात. पण पाकिस्तानची परिस्थिती बिकट आहे. त्यांचा खर्च काही निवडक देशांकडून मिळणाऱ्या मदतीवर चालतो. अशा परिस्थितीत दररोज होणारे कोट्यवधींचे नुकसान पाकिस्तान कसा भरून काढणार हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. हवाई हद्दीतील विमानांच्या उपस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय हवाई हद्दीत आजही हजारो विमानांचे जाळे दिसत आहे. तर पाकिस्तानच्या हवाई हद्दीत तुरळक विदेशी विमाने आणि त्यांची देशांतर्गत विमानेच दिसत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 30, 2025 4:05 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानच्या मास्टरस्ट्रोकने पलटी मारली; भारताला धडा शिकवण्याच्या नादात इज्जत तर गेलीच आता भीक मागण्याची वेळ


