पाकिस्तानचा नाश अटळ, भारताची निर्णायक युद्धाची तयारी; कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा, इस्लामाबादमध्ये खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India vs Pakistan: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडले आहेत. अमेरिकेतील एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानवर मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे.
वॉशिंग्टन: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानची कोंडी करणारे पाच मोठे निर्णय घेतले. या निर्णयानंतर पाकिस्तानने देखील व्यापर बंद करणे आणि हवाई मार्ग बंद असे काही निर्णय घेतले. दोन्ही देशातील तणाव फक्त इतक्यावर थांबणार की भारत अजून काही मोठी कारवाई करेल का याबाबत चर्चा सुरू आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करणार का याबाबत आता एक मोठा दावा करण्यात आला आहे आणि हा दावा थेट अमेरिकेतून करण्यात आला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असा दावा अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने चार राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या भीषण आणि क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील डझनहून अधिक प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्लीतील 100 हून अधिक विदेशी दूतावासांतील राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतीय विदेश मंत्रालयाने बैठकीसाठी बोलावले होते आणि या हल्ल्याबाबत माहिती दिली होती.
advertisement
द न्यूयॉर्क टाइम्स इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांना केवळ मदतीची याचना करण्यासाठी दूरध्वनी केले नव्हते. तर पाकिस्तानविरुद्ध भारत काय कारवाई करणार आहे, याची माहिती देण्यासाठी संपर्क साधला होता.
भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे की पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशानुसार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. कारण त्यांना पाकिस्तानच्या सत्तेवर नियंत्रण मिळवायचे आहे.
advertisement
या वृत्तातील दाव्यानुसार, भारतासोबतच्या चर्चेत सहभागी असलेल्या चार राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, नवी दिल्ली आपल्या शेजारील आणि कट्टर शत्रूविरुद्ध लष्करी कारवाईसाठी तयारी करत आहे. मोदींनी अशा शिक्षेचे वचन दिले आहे. ज्याची ते कल्पनाही करू शकत नाहीत.
पाकिस्तानवर भारताचा हल्ला?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अद्याप अधिकृतपणे दहशतवाद्यांची ओळख पटवलेली नाही आणि या वेळी भारताने सार्वजनिकरित्या कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. मात्र भारताने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे. तर पाकिस्तान सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.
advertisement
भारतीय विदेश मंत्रालयात जेव्हा विदेशी दूतावासांतील राजनैतिक अधिकाऱ्यांची बैठक झाली. तेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी गटांना पाकिस्तानच्या पूर्वीच्या समर्थनाच्या पद्धतींविषयी माहिती दिली. राजनैतिक अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांची चौकशी सुरू आहे. याव्यतिरिक्त भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याच्या काही गुप्तचर माहितीचा तपशीलही दिला आहे. भारताने दिलेल्या माहितीत गुन्हेगारांच्या चेहऱ्यांची ओळख पटवणारे आकडे (डेटा) समाविष्ट आहेत. जे पाकिस्तानातील असल्याचा दावा भारताने केला आहे.
advertisement
अमेरिकन वृत्तपत्राने म्हटले आहे की, तज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारावर दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यता अशी आहे की, पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी भारताला दहशतवादी हल्ल्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी वेळ हवा आहे. किंवा दुसरी शक्यता अशी आहे की, जागतिक स्तरावर सध्या अनेक युद्धांमुळे अराजकता माजलेली असताना. भारताला आपल्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नसेल.
advertisement
तज्ञांनी अशी भीती व्यक्त केली आहे की भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणुबॉम्ब असलेले देश आहेत. त्यामुळे जर हल्ले झाले तर त्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण होईल. द न्यूयॉर्क टाइम्स इंटरनॅशनलने म्हटले आहे की, यानंतरही असे दिसते की, भारतावर आपल्या प्रतिक्रियेला मर्यादित ठेवण्यासाठी कोणत्याही जागतिक दबावाचा परिणाम झालेला नाही आणि गेल्या काही वर्षांत आपली राजनैतिक आणि आर्थिक शक्ती वाढल्यानंतर भारत आपली ताकद दाखवण्यात अधिक आक्रमक झाला आहे. इराण आणि सौदी अरेबियाच्या सरकारांनी दोन्ही बाजूंशी चर्चा केली आहे आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या मध्यस्थीची ऑफर दिली आहे. संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनने संयम आणि चर्चेचे आवाहन केले आहे. परंतु अमेरिकेसह प्रमुख शक्तींकडून भारताला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भारत न्यायाच्या आपल्या शोधात अनेक देशांकडून मिळालेल्या समर्थनाला हिरवी झेंडी मानत आहे.
advertisement
भारताच्या युद्धात अमेरिका सामील होणार?
द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने भारताला जोरदार पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. परंतु अमेरिका भारताच्या युद्धात सामील होईल की नाही, हे सध्या सांगता येत नाही. मात्र अमेरिका सामील झाला नाही तरीही दक्षिण आशियाई देश जर युद्धात उतरले. तर अमेरिकेचा प्रभाव नक्कीच असेल. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ एडवांस्ड इंटरनॅशनल स्टडीजचे वरिष्ठ फेलो डॅनियल मार्की यांनी सांगितले की, 2019 मध्ये ट्रम्प प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत जो दृष्टिकोन ठेवला होता. तोच दृष्टिकोन या वेळीही दिसत आहे. त्यावेळी ट्रम्प प्रशासनाने भारताला समर्थनाचा संकेत दिला होता. पण जेव्हा भारताने सीमा ओलांडून हवाई हल्ले करत पाकिस्तानवर हल्ला केला. तेव्हा ट्रम्प प्रशासनाने संयम राखण्यासाठी आपला राजनैतिक दबाव वाढवला होता.
दुसरीकडे भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी म्हटले आहे की, काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी हल्ल्यानंतर 2019 आणि 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या हल्ल्यांनंतर मोदींकडे लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मात्र मेनन यांनी असेही म्हटले आहे की दोन्ही प्रतिस्पर्धकांमध्ये प्रतिशोध हाताबाहेर जाण्याची शक्यता नाही. ते म्हणाले, मला जास्त चिंता नाही. कारण दोन्ही देश व्यवस्थापित करता येण्याजोग्या शत्रुत्वाच्या पलीकडे जाणार नाहीत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 28, 2025 6:40 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानचा नाश अटळ, भारताची निर्णायक युद्धाची तयारी; कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा, इस्लामाबादमध्ये खळबळ


