Sunita Williams: 8 दिवसांचं मिशन 274 दिवसांवर कसं गेलं? सुनिता विल्यम्स अंतराळात का अडकल्या?

Last Updated:

पृथ्वीवर सुखरूप परत आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना थँक यू म्हणत नासा आणि जगाचे आभार मानले.

sunita williams spacex
sunita williams spacex
मुंबई: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स पृथ्वीवर सुखरुप परतल्या. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर जवळपास 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परत आले आहेत. त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले आणि पॅरॅशूटने ते फ्लोरिडातील किनारपट्टीवर लँड झालं. या दोघांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती.
या अंतराळवीरांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या. त्यामुळे ते 9 महिने अवकाशात अडकून राहिले होते. त्यावर मात करत आता ते सुखरूप परत आले आहेत. पृथ्वीवर परतीनंतर सुनिता विल्यम्स यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीवर सुखरूप परत आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना थँक यू म्हणत नासा आणि जगाचे आभार मानले.
घरवापसीसाठी स्पेसएक्सचं 'क्रू-10' मिशन तयार केलं. 15 मार्च 2025 ला स्पेसएक्सचं रॉकेट झेपावलं. मिशनमध्ये 4 अंतराळवीरांचा समावेश होता. फॉल्कन 9 रॉकेट, ड्रॅगन कॅप्सूल अंतराळात झेपावलं. ड्रॅगन कॅप्सूल रॉकेटपासून वेगळे झाले. डॉकिंगच्या प्रक्रियेनंतर अंतराळवीर ISSवर पोहचले. सुनिता विल्यम्स यांच्यासह बाकीच्या साथीदारांना घेऊन ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्वीवर परतले. पॅराशूटच्या मदतीने कॅप्सूल समुद्रात उतरले. सर्व प्रक्रियेला जवळपास 4 दिवस लागले.
advertisement
सुनिता विल्यम्स अंतराळात का अडकल्या?
5 जून 2024 ला स्टारलायनरनं अंतराळात झेपावल्या
8 दिवसांच्या 'क्रू फ्लाईट टेस्ट मिशन'वर गेल्या होत्या
सुनिता विल्यम्स यांच्यासह बुश विल्मोर बोईंगही होते
अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाला
अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हेलियम गळती
प्रक्षेपणानंतर 25 दिवसांत कॅप्सूलमध्ये 5 वेळा हेलियम गळती
एका अंतराळयानात अनेक थ्रस्टर असतात
advertisement
थ्रस्टरच्या मदतीनं अंतराळयान आपला मार्ग आणि वेग बदलतो
बिघाडामुळे 9 महिन्यांपासून स्पेस स्टेशनमध्ये अडकल्या
9 महीने 13 दिवसानंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतल्या आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोप पृथ्वीवर सुखरुप परतलेत. फ्लोरिडाील समुद्रात ड्रॅगन यानाच्या कॅप्सुलचं यशस्वीरित्या लँडिंग झालं. सुनीता विल्यम्स या कॅप्सुलमधून बाहेर येताच त्यांनी नासा तसंच जगाचे आभार मानलेत. दरम्यान दोघे अंतराळवीर सुखरुप असल्याचं नासाकडून सांगण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Sunita Williams: 8 दिवसांचं मिशन 274 दिवसांवर कसं गेलं? सुनिता विल्यम्स अंतराळात का अडकल्या?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement